मुलीच्या मृत्यूप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 08:43 PM2018-06-04T20:43:40+5:302018-06-04T20:43:40+5:30

मीरारोडच्या एका वसाहतीच्या  बगिच्यात खेळणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबाबत पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यां विरोधात हलगर्जीपणा मुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .

A case has been registered against the office bearers of the housing society | मुलीच्या मृत्यूप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुलीच्या मृत्यूप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next

मीरारोड - मीरारोडच्या एका वसाहतीच्या  बगिच्यात खेळणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबाबत पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यां विरोधात हलगर्जीपणा मुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . 

शनिवारी रात्री पाऊस पडला होता . त्या दरम्यान मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागात सॅण्ड स्टोन गृह संकुलातील बगिच्यात लहान मुलं खेळायला गेली . बगिच्याचे लोखंडी जाळीचे दाराला हात लावताच  श्रुती राम यादव ( 11 )  हिचा विजेचा जबर धक्का लागून जागीच मृत्यू झाला होता . तर श्रद्धा सुरेंद्र कनोजिया ( 12 )  सह अन्य दोन मुलं देखील विजेच्या धक्क्याने जखमी झाले होते . श्रद्धा हिला रुग्णालयात दाखल केले होते .

मीरारोड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती . तर रिलायन्स एनर्जीचा पथकाने येऊन पाहणी केली होती . दरम्यान विजेचा प्रवाह लोखंडी जाळीत कसा व कुठून आला याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यास पाचारण केले होते . बगिच्यात रोषणाई करण्यात आली होती . तर मोठा एलईडी दिवा लावण्यासाठी लोखंडी खांब उभारण्यात आला होता . काही वायरीचे तुकडे झाले होते . 

दरम्यान श्रुतीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी मीरारोड पोलिसांना फिर्याद दिली . सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सुमारे 6 महिने आधी विजेचा धक्का लागत असल्याने खबरदारी घेऊन दुरुस्ती करून घेण्यास सांगितले होते . पण त्यांनी दुर्लक्ष केल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचे यादव म्हणाले . फिर्यादी नुसार पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष , सचिव व खजिनदार यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ निरीक्षक वसंत लब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र कोरे पुढील तपास करत आहेत . 

Web Title: A case has been registered against the office bearers of the housing society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.