विद्यार्थ्यास मारणाऱ्या खाजगी शिक्षकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Published: April 5, 2023 03:37 PM2023-04-05T15:37:31+5:302023-04-05T15:38:06+5:30

मुलाने अभ्यास केला नाही म्हणून मारल्याचे कारण दिले . 

case has finally been registered against the private teacher who beat the student | विद्यार्थ्यास मारणाऱ्या खाजगी शिक्षकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल 

विद्यार्थ्यास मारणाऱ्या खाजगी शिक्षकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदर पश्चिमेस एका खाजगी शिकवणी चालवणाऱ्या शिक्षकाने १२वर्षाच्या विद्यार्थ्यास अभ्यास केला नाही म्हणून मारल्या प्रकरणी अखेर भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . भाईंदर पश्चिमेस वैशाली हॉटेल जवळ असलेल्या स्कॉलिस्टिक अकॅडमी ह्या संचित अग्रवाल यांच्या खाजगी क्लास मध्ये पीडित १२ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी शिकण्यास जातो . ३१ मार्च रोजी शिकवणीत गेलेला मुलगा घरी रडत रडत आल्याचे कळल्याने   वडिलांनी मुलाची विचारपूस केली . संचित अग्रवाल याने कानावर जोराने मारल्याचे मुलाने सांगितले . वडिलांनी अग्रवाल याला कॉल केला असता , मुलाने अभ्यास केला नाही म्हणून मारल्याचे कारण दिले . 

मुलाला भाईंदर पोलीस ठाण्यात नेऊन नंतर भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेले . तेथे कानाच्या डॉक्टरकडे जाण्यास सांगितले.  त्यावेळी पोलिसांनीअदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. कानाच्या डॉक्टरने तपासून कानाच्या पडद्यावर सूज आली व त्याला कमी ऐकू येत असल्याचा अहवाल दिला . त्यानंतर भाईंदर पोलिसांनी संचित अग्रवाल विरुद्ध विद्यार्थ्यास क्रूर वागणुक देवुन मारहाण करून इजा पोहचवल्या प्रकरणी मुलांची काळजी व संरक्षण कायदा , भादंवि नुसार ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: case has finally been registered against the private teacher who beat the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.