मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या आणखी ५ जणांवर गुन्हे दाखल

By धीरज परब | Published: June 9, 2023 10:11 PM2023-06-09T22:11:26+5:302023-06-09T22:11:49+5:30

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती मध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी ...

Case registered against 5 more persons for giving fake certificate in police recruitment in Mira Bhayander-Vasai Virar Police Commissionerate | मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या आणखी ५ जणांवर गुन्हे दाखल

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या आणखी ५ जणांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती मध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी लागणाऱ्या आणखी ५ जणांवर पोलिसांनी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत . या आधी देखील ५ जणांवर गुन्हे दाखल असून बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या आरोपींची संख्या १० झाली आहे . ह्या सर्वाना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे . 

पोलीस आयुक्तालयाने ९८६   पोलीस शिपाई व  १० वाहन चालक पोलीस शिपाई पदासाठी गेल्यावर्षा पासून भरती प्रक्रिया राबवली होती . गडचिरोली पोलीस भरतीत प्रकल्पग्रस्त म्हणून बनावट प्रमाणपत्रे आढळून आल्याने मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने देखील प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त म्हणून असलेल्या आरक्षणातून निवड झालेल्यांची प्रमाणपत्रे पडताळणी सुरु केली आहे .  

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची पडताळणी मध्ये आणखी ५ जणांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी  आकाश आत्माराम डोईफोडे ; राहुल एकनाथ राठोड ; श्रीकांत हनुमंत नवले ; विशाल विष्णु वाघमोडे आणि राहुल बबन पवार ह्या ५ जणांवर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . 

ह्या आधी पोलिसांनी फिरोज जहाँगीर पिंजारी (२९) ; अमोल चंदु दिपके (२५) ; कानिफनाथ कचरू पाखरे (२५) ; तुकाराम अण्णा नैराळे (२७) ; चंद्रकांत सर्जेराव हिंदुळे (२६) यांच्यावर बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्या बद्दल काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . आरोपीना अजून अटक केली नसून पोलीस चौकशी करत आहेत . सदर बनावट प्रमाणपत्र त्यांनी कुठून बनवून घेतली वा कोणी बनवून दिली ? या बाबतचा तपास पोलीस करत आहेत . 

 

Web Title: Case registered against 5 more persons for giving fake certificate in police recruitment in Mira Bhayander-Vasai Virar Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.