अंबरनाथमध्ये दुधाच्या दुकानातून रोकड चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:10+5:302021-03-06T04:39:10+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेच्या जागृत गल्ली परिसरात दुधाच्या दुकानातून १२ हजारांची रोकड चोरल्याची घटना बुधवारी घडली. हा संपूर्ण प्रकार ...
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेच्या जागृत गल्ली परिसरात दुधाच्या दुकानातून १२ हजारांची रोकड चोरल्याची घटना बुधवारी घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
जागृत गल्लीत राधा कृष्ण डेअरी असून, या दुकानाचे मालक श्यामलाल यादव हे बुधवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास दुकानात बसले होते. यावेळी १५ ते १६ वर्षे वयोगटांतले दोन चोरटे त्यांच्या दुकानात आले आणि अमूल कूल दूध मागितले. यावेळी यादव यांनी त्यांना सुट्टे पैसे परत देण्यासाठी ड्रॉव्हर उघडला असता, त्यात बरेच पैसे असल्याचे या चोरट्यांना दिसले. त्यामुळे या दोघांनी यादव यांना आणखी २-४ बाटल्या अमूल दूध देण्यास सांगितले. यादव यांची पाठ वळताच, त्यांनी ड्रॉव्हरमधून पैशांची बरणी उचलून पोबारा केला. या बरणीत जवळपास १० ते १२ हजार रुपये असल्याची माहिती श्यामलाल यांचा मुलगा राहुल यादव याने दिली. आदल्याच दिवशी त्याने दुधाच्या लाइनची बिले ग्राहकांकडून आणली होती. हे पैसे घाऊक दूधविक्रेत्यांना देण्यासाठी दुकानात ठेवले असतानाच ते चोरीला गेले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, फक्त एक कॉन्स्टेबल येऊन बघून गेला. मात्र, एफआयआर घेतला नसल्याची माहिती राहुल यांनी दिली.
--------------------------------------------