बिबळ्यांनी घेतली वस्तीकडे धाव

By admin | Published: January 4, 2016 01:29 AM2016-01-04T01:29:49+5:302016-01-04T01:29:49+5:30

गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत.

The cats took the bus to the village | बिबळ्यांनी घेतली वस्तीकडे धाव

बिबळ्यांनी घेतली वस्तीकडे धाव

Next

पालघर : गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामागे लगतच्या जिल्ह्यातील ऊसाची झालेली तोड, बिबळ्यांची वाढती संख्या आणि जंगलात जाणवणारा भक्षांचा अभाव व त्यांचा वीणीचा काळ ही कारणे असल्याचे वनखात्यांच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
हिवाळा हा बिबळ्यांच्या प्रजननाचा काळ आहे. पावसाळ्यात बिबळ्यांच्या नर-मादीचे मिलन होते व हिवाळ्यात मादी पिल्लांना जन्म देते त्यासाठी त्यांना लागणारा एकांत हे नर, मादी बिबळे ठाणे, नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या ऊसाच्या फडामध्ये मिळवीत असतात. दिवसभर फडामध्ये अगदी आतल्या बाजूस राहायचे आणि रात्री अथवा पहाटे लगतच्या शेतावरील प्राणी फस्त करायचे अशी त्यांची पद्धती असते. परंतु ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाला की, ऊसाची तोड सुरू होते आणि या बिबळ्यांना पिलासह जवळपासच्या जंगलाचा अथवा मिळेल त्या रानावनाचा आश्रय घ्यावा लागतो. मादी प्रसूत झाल्यामुळे अशक्त झालेली असते. त्यामुळे ती जंगलात शिकार करण्याऐवजी जवळपासच्या मानवी वस्तीत असलेल्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य करणे पसंत करते. कारण ते बांधून ठेवले असल्यामुळे तिच्या तावडीत सहज सापडतात.
या कारणाबरोबरच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तानसा अभयारण्य यातील बिबळ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांना आवश्यक त्या प्रमाणात तिथे भक्ष्य उपलब्ध नसल्यामुळे ते मानवी वस्तीकडे सध्या धाव घेताहेत. दुसरीकडे रानडुक्करांची संख्या प्रचंड वाढली आहे. ते याच परिसरातल्या गाव-पाड्यातील शेतीला, पिकांना फस्त करण्यासाठी येत असतात. जव्हार तालुक्यात अशा डुकरांच्या हल्ल्यात गेल्याच महिन्यात तीन शेतकरी जखमी झाले होते. या डुकरांची शिकार करण्यासाठी बिबळे गाव-पाड्यानजीक येतात आणि डुकरे मिळाली नाही तर तेथील पाळीव प्राणी उचलून नेतात. यामध्ये वनखात्याच्या हाती पिंजरा लावणे एवढाच उपाय असतो. परंतु तो सुद्धा कुठेही लावता येत नाही. बिबळ्या हा शेड्युल ए मधला प्राणी असल्याने त्याबाबत कोणतीही कारवाई करताना वनखात्याला असंख्य नियमांचे पालन करावे लागते. बिबळ्याने जनावरे उचलून नेली अथवा त्यांना भक्ष्य केले की गावकरी पिंजरा लावा अशी मागणी करतात. परंतु जोपर्यंत बिबळ्या हा नरभक्षक होत नाही किंबहुना त्याचा उच्छाद निर्माण होत नाही तोपर्यंत पिंजरा लावता येत नाही. तो लावण्याची प्रक्रिया देखील मोठी असते. हे देखील गावकऱ्यांनी लक्षात घ्यावे. बिबळ्या हा श्वांपद आहे. शिकार करणे हा त्याचा स्वभाव आणि पोट भरण्याचा भाग आहे. त्यामुळे केवळ त्याने एखाद्या वस्तीतून प्राणी उचलून नेले अथवा मारून खाल्ले या कारणासाठी त्याला पकडण्याकरीता पिंजरा लावता येत नाही. हे समजून घ्यावे, असे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
> कुत्रा, शेळ्या, मेंढया, करडू, गाई, म्हशी हे प्राणी उघड्या गोठ्यात बांधून ठेऊ नका.
शक्यतो रात्री लाईट सुरू ठेवा, घराच्या किंवा मळ्यातील घराच्या आसपास शेकोटी पेटवून ठेवा. ते शक्य नसेल तर मशाल, टेंभा, पलिते पेटते ठेवा.
घराचे दरवाजे मजबूत ठेवा, खिडक्यांना जाळ्या लावा.

Web Title: The cats took the bus to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.