दाटीवाटीमुळे नागरी सुविधा देण्यात अडचणी

By admin | Published: July 30, 2015 11:25 PM2015-07-30T23:25:02+5:302015-07-30T23:25:02+5:30

कल्याण (पूर्व), प्र.क्र. ४७, श्रीराम कॉलनी प्रभागात अंदाजे लोकसंख्या ११ हजार असून अमराठी भाषिकांचा टक्का मोठा आहे. साईबाबा कॉलनी, औवधारामनगर, भानुशालीनगर, पंचशील कॉलनी,

Causes of civil services due to low-lyingness | दाटीवाटीमुळे नागरी सुविधा देण्यात अडचणी

दाटीवाटीमुळे नागरी सुविधा देण्यात अडचणी

Next

- दिवाकर गोळपकर,  कोळसेवाडी
कल्याण (पूर्व), प्र.क्र. ४७, श्रीराम कॉलनी प्रभागात अंदाजे लोकसंख्या ११ हजार असून अमराठी भाषिकांचा टक्का मोठा आहे. साईबाबा कॉलनी, औवधारामनगर, भानुशालीनगर, पंचशील कॉलनी, साकेत कॉलनी, महेश कॉलनी इ. वसाहतींमध्ये उत्तर प्रदेश, बिहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, दक्षिण भारतीय वगैरे ९५ टक्के चाळी व ५ टक्के इमारतींमध्ये सामावले आहेत. दाटीवाटीच्या लोकवस्तीमुळे नागरी सुविधा पुरविण्यात अनेक अडचणी येतात.
या प्रभागात गटारे, पायवाटांव्यतिरिक्त विशेष सुविधा नाही. कारण, सर्व्हे नं. २९ उद्यानाचे आरक्षण होते. परंतु, आरक्षणापैकी ९० टक्के भाग आशेळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेला आहे व १० टक्के आरक्षित जमीन मनपामध्ये आहे. पण, तेथे चाळी झालेल्या आहेत. प्रथमेशनगर सर्व्हे नं. ५८ मध्ये ३५०० चौ.मी. मोकळी जागा आहे. परंतु, मनपाकडे हस्तांतरित नसल्यामुळे व प्राथमिक शाळेचे आरक्षण असूनही खाजगी जागेमुळे विकास करता येत नाही.
या प्रभागात पूर्वी दिवसाआड टॅँकरने पाणीपुरवठा होत असे. सर्वत्र पाणीटंचाई होती. परंतु, पाणीपुरवठ्याला प्राधान्य देऊन मोहीम राबविल्यामुळे प्रथमेशनगर, अर्जुननगर, बाळकृष्ण कॉलनी, मातोश्रीनगर आदी सर्व वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचे नगरसेवक विक्रम तरे यांनी सांगितले आहे.
पंचशील कॉलनी, ओंकार बिल्डिंग, मातोश्रीनगर, साईबाबा कॉलनी, अमोलनगर इ. बहुसंख्य वासाहतींमध्ये नव्याने गटारे बांधली व काही ठिकाणी दुरुस्त केली. परंतु, रहिवाशांच्या मते तुंबलेली गटारे वेळेवर साफ होत नाही. या प्रभागात नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

प्रमुख रस्त्यांखाली मलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. परंतु, वसाहतींतर्गत व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे मैला गटारे व नाल्यांतून वाहत असतो. रामनगरमध्ये तळ अधिक दोन मजली सुलभ शौचालय असून ते वापर नसल्यामुळे बंद आहे. कचराकुंड्या दोन आहेत. प्रथमेशनगर व गावदेवी प्रवेशद्वार येथे घंटागाड्यांच्या वेळेत नागरिक त्यांचा लाभ घेतात. परंतु, बहुतांश कचरा गटारे, नाल्यांमध्ये टाकला जातो. औवधारामनगरचा रस्ता अर्धवट पूर्ण झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

Web Title: Causes of civil services due to low-lyingness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.