अल्पवयीन मुलाच्या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी: आरोपीच्या भावानेच केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 09:18 PM2018-07-31T21:18:50+5:302018-07-31T22:00:25+5:30

केवळ संशयावरुन मानपाडा पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी विवस्त्र करून बेदम मारहाण केली असून स्थानिक गाववाल्यांच्या दबावाला बळी पडून यात गोवल्याचा आरोप इम्तियाज आलम याच्यासह त्याचे वकील सुनिल रवानी यांनी मंगळवारी केला. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार केली आहे.

CBI seeks CBI probe into murder of minor child: demanded by the accused's brother | अल्पवयीन मुलाच्या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी: आरोपीच्या भावानेच केली मागणी

मुख्यमंत्र्यांसह मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार

Next
ठळक मुद्देडोंबिवलीतील मुलावरील लैंगिक अत्याचार आणि हत्येचे प्रकरण केवळ संशयावरून पोलिसांची पाच भावांना बेदम मारहाण झाल्याचा आरोपमुख्यमंत्र्यांसह मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार

ठाणे : डोंबिवलीतील सात वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचारानंतर खून प्रकरणाला आता वेगळेच वळण आले आहे. यातील आरोपींना केवळ संशयावरुन मानपाडा पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी विवस्त्र करून बेदम मारहाण केली असून स्थानिक गाववाल्यांच्या दबावाला बळी पडून यात गोवल्याचा आरोप इम्तियाज आलम याच्यासह त्याचे वकील सुनिल रवानी यांनी मंगळवारी केला. याप्रकरणी सीबीआय मार्फतीने चौकशीची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आॅर्चिड इमारतीच्या मल:निस्सारण टाकीत २५ मे २०१८ रोजी एका सात वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला होता. त्याला नशेचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनाच्या तपासणीत उघड झाले होते. त्यानंतर त्याला टाकीत फेकून दिले होते. या गंभीर प्रकारातील आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे स्थानिक गाववल्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर अनेक मोर्चे आंदोलने केली होती. त्यानंतर १७ जुलै २०१८ रोजी एहसान आणि नदीम आलम या दोघा भावांना अटक केली होती. तत्पूर्वी पोलिसांनी या इमारतीत नळ दुरुस्तीचे काम करणाऱ्या ऐहतशान, आरमान आणि इम्तियाज आलम यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या पाचही जणांना बेदम मारहाण केल्याचा आरोप इम्तियाजने केला. केवळ संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एहसान आणि नदीम या दोघांना तर विवस्त्र करून ‘थर्ड डिग्री’ दाखविल्याचा आरोप अ‍ॅड. रवाणी यांनी केला आहे. नदीमला तर बेदम मारहाण केल्याने पोलिसांनी त्याला परस्पर १३ जुलै रोजी येथील सिद्धिविनायक या खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसानंतर परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून त्याला अन्य एका खासगी रुग्णालयात हलविले. मारहाण करून त्याच्याकडून जबदरदस्ती गुन्ह्याची कबुली करून घेतली. तसेच सर्व प्रकारचे बनावट पुरावे तयार केले. त्यामुळे १३ ते १७ जुलै दरम्यान दोन्ही रु ग्णालय आणि १० ते १७ जुलैपर्यंतचे मानपाडा पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत, अशी मागणी आरोपीचा भाऊ इम्तियाज याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, मानवी हक्क आयोग, पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. निर्दोष संशयितांना यात नाहक गोवल्याने आपण यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही रवानी यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
............................
पोलिसांनी यात दोन महिन्यांनी घटनास्थळावरून चॉकलेटचे रॅपर, गवत असे पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी सुरुवातीला इम्तीयाज, अरमान, एहसान, नदीम आणि इहतसान या पाच भावांना १० जुलै रोजी ताब्यात घेतले. नंतर एहसान आणि नदीम या दोघांना अटक १७ जुलै रोजी अटक केली. यातील इहतसान याला त्याच दिवशी सोडले. तर इम्तियाज आणि अरमान यांना १६ जुलै रोजी चौकशीनंतर सोडण्यात आले. तोपर्यत यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप रवानी यांनी केला.. शिवाय, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बोलण्यासाठी संशयितांपैकी अरमान (१६) याला एकाने दोन हजार तर अन्य एका पोलिसाने एक असे तीन हजार रुपये दिल्याचाही आरोप आहे.

 

‘‘आरोपी आपल्या बचावासाठी असे खोटे आरोप करीत असतात. त्यांनी केलेल्या घृणास्पद कृत्याची कबूलीही दिली आहे. यात साक्षीदार आणि पुरावेही मिळाले आहेत. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याने अधिक भाष्य करणार नाही. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप असेल तर आरोपींनी पहिल्याच दिवशी सांगणे अपेक्षित होते.’’
गजानन काब्दुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे.
 

Web Title: CBI seeks CBI probe into murder of minor child: demanded by the accused's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.