CBSE Board 10th Result 2021 : मुंबई संघातील क्रिकेटपटू व ठाण्यातील श्री माँ स्कूलमधील महेक पोकरला दहावीत ९० टक्के मार्क्स!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 03:49 PM2021-08-03T15:49:19+5:302021-08-03T15:49:46+5:30
ठाणे - सीबीएसई(CBSE) बोर्डाच्या दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. बोर्डाने अधिकृत वेबसाईटवरून निकालाची घोषणा केली आहे
- विशाल हळदे
ठाणे - सीबीएसई(CBSE) बोर्डाच्या दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. बोर्डाने अधिकृत वेबसाईटवरून निकालाची घोषणा केली आहे. या वर्षी दहावीत एकूण ९९.०४ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकता. बोर्डाने निकालाच्या घोषणेसोबतच अधिकृत वेबसाईटही चालू केली आहे. ठाण्यातील घोड़बंदर रोड वरील पातली पाड़ा येथे असणाऱ्या श्री माँ स्कूलमधील कुमारी महेक पोकरने आज लागलेल्या 10 विच्या CBSC बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्के मार्क्स मिळवले.
महेक पोखर ही श्रीं माँ स्कुल ची क्रिकेट खेळाडू आहे . 2019 मधे आसाम येथे झालेल्या 19 वर्षा खालील मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. महेक ला क्रिकेट मधेच आपले करिअर करायचे आहे. महेक चे क्रिकेट कोच दर्शन सर , प्रतिष सर , जयेश सर यानी सरावा दरम्यान खुप मेहनत घेतली असे तिने सांगितले , महेकला फिटनेस कोच अजित कुलकर्णी, शाळे मधून शाळेचे सचिव राजन आयंगर सरांचे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा अय्यर यांचे देखील मोलाचे सहकार्य आहे असे तिने लोकमत शी बोलताना सांगितले
ठाण्याच्या महेक पोकरनं CBSE निकालात मिळालं घवघवीत यश, १० वी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्के गुण, मेहक हा क्रिकेटपटू असून २०१९ मधे आसामयेथे झालेल्या १९ वर्षा खालील मुंबई संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते #CBSEResultspic.twitter.com/RV9MupvXjv
— Lokmat (@MiLOKMAT) August 3, 2021