सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्याला केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:46 PM2017-08-10T16:46:32+5:302017-08-10T16:47:33+5:30

मिलापनगरमधील श्रवण बंगल्यात प्रशांत सिन्हा यांच्या घरी घरफोडीची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.

CCTV footage stolen after loot | सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्याला केली अटक

सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्याला केली अटक

Next

डोंबिवली, दि. 10 - मिलापनगरमधील श्रवण बंगल्यात प्रशांत सिन्हा यांच्या घरी घरफोडीची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर मिलापनगरात सातत्याने घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला.

मिलापनगरात पोलिसांनी महिनाभर गस्त घातली. तसेच पाळत ठेवली. या पाळतीच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्याला दिवा येथून अटक केली. त्याचे नाव राम मंजू गुप्ता (35) असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून त्याने दिवा येथे भाड्याने खोली घेतली होती.

घरफोडी मोठी असल्याने वारंवार होणा-या घरफोडीच्या घटनांमागे टोळी असल्याचा संशय पोलिसाना होता. मात्र, सगळ्या घटनांच्यामागे एकटा गुप्ताच होता. त्याने हाय प्रोफाईल असलेल्या मिलापनगरातील लोकवस्तीला लक्ष्य केले होते. त्याला पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून 31 तोळे सोने जप्त केले आहे. महिन्याभराची पाळत पोलिसांनी ठेवल्याने त्यांना यश आले आहे.

Web Title: CCTV footage stolen after loot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.