सर्वत्र ईद उत्साहात साजरी
By admin | Published: June 27, 2017 03:00 AM2017-06-27T03:00:46+5:302017-06-27T03:00:46+5:30
पावसाने आज उघडीप दिल्याने जिल्ह्यात सर्वत्र ईद उत्साहाने साजरी झाली. ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर नमाजही मोठ्या भक्क्तीभावाने अदा केला गेला.
हितने नाईक/शौकत शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/डहाणू : पावसाने आज उघडीप दिल्याने जिल्ह्यात सर्वत्र ईद उत्साहाने साजरी झाली. ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर नमाजही मोठ्या भक्क्तीभावाने अदा केला गेला.
डहाणू तालुक्यात आज हिंदु-मुस्लीम बांधवांनी रमजान ईद मोठया उत्साहात साजरी केली . तालुक्याच्या चिंचणी, तारापूर, डहाणू, कासा, वरोजी, सावटा, डहाणू गांव इत्यादी मुस्लिमबहुल भागांत सामुदायिक नमाज पढल्यानंतर हिंदु-मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मशिदित नमाजासाठी सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी ८.३० वाजता सामुदायिक नमाज झाल्यानंतर बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी फत्तेसिंग पाटील, पोलीस उपनिरिक्षक दिपक जोगदंड, (वाणगांव) जी डब्ल्यू बांगर (तारापूर) पोलीस निरिक्षक सुदाम शिंदे डहाणू, पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुठे कासा, यांनी मशिदीच्या बाहेर मुस्लिमांना पुष्प देऊन ईद मुबारक केले. तर आमदार आनंद ठाकूर, आमदार अमित घोडा, आमदार पास्कल धनारे यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान या वर्षी चिंचणी रिफाई मोहल्ला येथे आशिया खंडातील मुस्लिम समाजाचे सर्वात मोठे धर्मगुरू सलीम बाबा हे चिंचणी येथे मुक्कामाला असल्याने मुंबई, गुजरात, दमण तसेच इतर राज्यातून हजारो भाविकांनी त्यांचे आशिर्वाद घेतले.