ठाण्यातील वैभव हास्य योग क्लब, लोढा सुंकुलचा पहिला वाढिदवस सोहळा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:16 PM2017-12-25T16:16:54+5:302017-12-25T16:19:21+5:30

हास्य योगाचे महत्त्व आणि विविध प्रकार सांगत वैभव हास्य क्लबचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.

Celebrate the first Birthday Celebration of Lodha Sankul, the glory of Thaani's Humor Yoga Club | ठाण्यातील वैभव हास्य योग क्लब, लोढा सुंकुलचा पहिला वाढिदवस सोहळा साजरा

ठाण्यातील वैभव हास्य योग क्लब, लोढा सुंकुलचा पहिला वाढिदवस सोहळा साजरा

Next
ठळक मुद्देवैभव हास्य योग क्लबचा पहिला वाढिदवस साजरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाण्यातील हास्य योग चळवळीचे प्रणेते डॉ. माधव म्हस्के उपस्थितआपले आयुष्य आनंदाने जगण्यासाठी हास्ययोग उपयोगी - डॉ. माधव म्हस्के

ठाणे: आज ठाणे शहरात २५ हास्य योगाचे क्लब कार्यरत आहेत. हे सर्व क्लब जागतिक किर्तीचे हास्यगुरू डॉ. मदन व माधुरी कटारिया यांच्या प्रेरणेने निर्माण झाले आहेत. रविवार २४ डिसेंबर रोजी अशाच एका क्लबचा तो म्हणजे वैभव हास्य योग क्लबचा पहिला वाढिदवस मोठ्या जोमाने साजरा करण्यात आला. यावेळी ठाण्यातील १० हास्य क्लबच्या प्रमुखांची तसेच, सदस्यांची शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होती.                 वैभव हास्य क्लबच्या अध्यक्षा पुष्पा उपाध्या यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच गेल्या वर्षाचा आढावा घेतला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी ठाण्यातील हास्य योग चळवळीचे प्रणेते डॉ. माधव म्हस्के उपस्थित होते. यावेळी त्यांनी हास्ययोगाचे विविध प्रकार सांगत, हास्याचे शारिरीक आणि मानसीक फायदे उपस्थितांना सांगितले. आपले आयुष्य आनंदाने जगण्यासाठी हास्ययोग कसा उपयोगी ठरतो हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. ते म्हणाले की, आज जगभर १०५ देशांत हास्य योगाचा प्रसार झाला आहे. हास्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. फुप्फुसांची क्षमता वाढते. आपचनाचा त्रास नाहीसा होतो. निद्रानाशवर हे
एक उत्तम औषध आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदय सुदृढ राहते. नकारात्मकता जावून सकारात्मकता येते. हास्यायोगातील प्राणयामामुळे आॅक्सिजनची मात्रा संपूर्ण शरीरात व मेंदूमध्ये वाढते. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. हास्य योग हे केवळ ज्येष्ठांसाठी नव्हे तर सर्वच वयोगटासाठी फायदेशीर आहे. हास्य योगाच्या सरावामुळे दु:खाना सामोरे जाण्याची शक्ती वाढते अशी माहितीही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यात दिली. याप्रसंगी सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त अशोक जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, मनु शाह यांच्या क्रि केट थीम हास्याने सर्वांना खुश केले. साहित्यिका विमल खरात यांनी एक कविता सादर करून श्रोत्यांचे लक्ष वेधले. संपूर्ण कार्यक्र माचे सूत्रसंचालन जितेंद्र धर्मसी व छाया सिंग यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन होऊन कार्यक्र माची सांगता झाली.

Web Title: Celebrate the first Birthday Celebration of Lodha Sankul, the glory of Thaani's Humor Yoga Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.