डॉक्टर, परिचारिकांचा सन्मान करून रक्षाबंधन साजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:42 AM2021-08-23T04:42:29+5:302021-08-23T04:42:29+5:30
डोंबिवली : कोरोनाकाळात कठीण प्रसंगात परिचारिका, डॉक्टर आणि आया यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक रुग्णशय्येला खिळलेल्या भावांची ...
डोंबिवली : कोरोनाकाळात कठीण प्रसंगात परिचारिका, डॉक्टर आणि आया यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक रुग्णशय्येला खिळलेल्या भावांची रक्षा केली. या सर्वांचे ऋण मान्य करून रविवारी रक्षाबंधनानिमित्त डॉक्टर आणि परिचारिकांचा समर्पण सेवा पुरस्कार प्रदान करून अक्षरआनंद व अक्षरमंच या संस्थेने सन्मान केला. संस्थापक हेमंत नेहते व अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला.
हेमंत नेहते, संस्थेचे सल्लागार डॉ. सुनील खर्डीकर यांच्या हस्ते डॉ. अंजली खाडीलकर, डॉ. सुधा पवार, डॉ. ज्योती व्यवहारे, डाॅ. सोनल सागर खटावकर, तसेच परिचारिका कावेरी ढाके, वनिता देशमुख, तृप्ती ढाके, गीता पाटील, राधिका पांचाळ, शीतल गुरव, भाग्यश्री गवळी, परिचारिका मंदा इंगळे, माया भावसार, उषा सावंत, गोदावरी साबळे, मीना नाईक, माया गायकवाड, अनिता कासरे, पार्वती झहांकी (आया) यांचा समर्पण सेवा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
---------
फोटो आहे