थर्टी फर्स्ट साजरा करा... पण जपून ! पोलिसांची करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:57 AM2018-12-27T03:57:39+5:302018-12-27T03:57:53+5:30

नववर्षाचे स्वागत आनंदाने करा, पण स्वागताच्या नावाखाली दारू पिऊन कुठेही धांगडधिंगा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.

Celebrate Thirty First ... but beware! The police's gray eyes | थर्टी फर्स्ट साजरा करा... पण जपून ! पोलिसांची करडी नजर

थर्टी फर्स्ट साजरा करा... पण जपून ! पोलिसांची करडी नजर

googlenewsNext

- जितेंद्र कालेकर
ठाणे : नववर्षाचे स्वागत आनंदाने करा, पण स्वागताच्या नावाखाली दारू पिऊन कुठेही धांगडधिंगा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरासह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याची माहिती फणसळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांमधील सर्वच ३५ पोलीस ठाण्यांचा आयुक्तांनी यासंदर्भात नुकताच आढावा घेतला. ३१ डिसेंबर रोजी या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्याच्या येऊरसह कल्याणच्या खाडीकिनारी, भिवंडीतील ढाबे आणि हॉटेल्समध्ये पार्ट्यांचे नियोजन केले जाते. पार्टीच्या नावाखाली हुल्लडबाजी, धांगडधिंगा घालून हाणामारीचे प्रकार सर्रास घडतात. यातूनच एकमेकांवर अगदी चाकूने वार करण्यासारख्या घटना घडतात. तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही सर्रास घडतात. याशिवाय, पार्टीच्या ठिकाणी जाणारी तरुण मंडळी मद्यप्राशन करून वाहने चालवतात. त्यामुळे गंभीर अपघातही होतात. या पार्श्वभूमीवर ठाणे आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाºयांना कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, प्रताप दिघावकर यांच्यासह पाचही परिमंडळांचे उपायुक्त तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या असा सुमारे साडेतीन ते चार हजारांचा फौजफाटा ३१ डिसेंबर रोजी बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. सायंकाळी ६ ते दुसºया दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत आनंदाने करा, पण कोणीही अतिउत्साहाने मद्यप्राशन करून गैरकृत्य केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची तंबी फणसळकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
येऊर, उपवनसह ठाण्यातील अनेक भागांत विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय, महामार्गावरील हॉटेल्स आणि मॉल्समध्ये अनुचित प्रकार घडू नये, यासाठीही पेट्रोलिंग राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाहतूक विभागही करणार कारवाई

दारू पिऊन वाहन चालवणाºयांवरही ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ निरीक्षकांच्या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेचे ६०० अधिकारी, कर्मचारी तैनात राहणार आहेत. हे कर्मचारी श्वासविश्लेषक यंत्रणेद्वारेही तपासणी करणार आहेत. त्यामुळे मद्यप्राशन करून पार्टीला जाणारे आणि येणारे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

उत्पादन शुल्कही सतर्क
जिथे विनापरवाना पार्ट्यांचे आयोजन केले जाईल, त्याठिकाणी पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही करडी नजर ठेवणार आहेत. विनापरवाना पार्टी करणाºयांवर टेहळणी करण्यासाठी ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली आदी भागांत १२ निरीक्षकांची पथके तैनात केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे अधीक्षक कार्यालयाने दिली.

Web Title: Celebrate Thirty First ... but beware! The police's gray eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस