ज्ञानसाधनात युटोपीआ यंदा ऑनलाइन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:02+5:302021-03-04T05:16:02+5:30
ठाणे : विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील युटोपीआ हा कार्यक्रम यंदा ऑनलाइन पार पडला. या ...
ठाणे : विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील युटोपीआ हा कार्यक्रम यंदा ऑनलाइन पार पडला. या वेळी आयोजित केलेले ग्रुप अ लाइक डे, हॅलोविन डे, ट्रॅडिशनल डे यांसारखे डेज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच ठरले. तर फेसपेंटिंग, मेंदी, नेल आर्ट, नृत्य, गायन, रांगोळी, एगशेल पेंटिंग, कोविड १९ मास्क पेंटिंग अशा विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेत्री श्रेया बुगडे या आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते युटोपीआ महोत्सवाचे ऑनलाइन उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन केले होते. यात फोटोग्राफी, शॉर्ट फिल्म, एकपात्री अभिनय, पोस्टर अशा विविध स्पर्धा रंगल्या. त्यानंतर पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात सुप्रसिद्ध आरजे दिलीप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून रेडिओ चॅनल्सचे महत्त्व, रेडिओजॉकी म्हणून काम करताना आवश्यक स्वभाववैशिष्ट्ये तसेच मसाला चहा व लव यू जिंदगी हे त्यांचे कार्यक्रम असे विविध मुद्दे सविस्तरपणे मांडले.