मरवडा समुद्रकिनारी काव्य संमेलन उत्साहात
By admin | Published: May 5, 2017 05:27 AM2017-05-05T05:27:28+5:302017-05-05T05:27:28+5:30
‘मी घडताना’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन रविवारी मरवडा समुद्रकिनारी उत्साहात झाले. त्यात
बोर्डी : ‘मी घडताना’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन रविवारी मरवडा समुद्रकिनारी उत्साहात झाले. त्यात राज्यभरातील कवी सहभागी झाले होते.
शतकीय परंपरा लाभलेल्या मत्स्यमाता मंदिराच्या आवारात कवीवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला प्रारंभ झाला. या वेळी चित्रपट निर्माते प्रवीण जावळे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा कार्यवाह सायमन मार्टिन, जिल्हाध्यक्ष नंदन पाटील, जिल्हा प्रतिनिधी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कवी जनार्दन पाटील, प्राचार्या आशा वर्तक, सरपंच राजश्री कोल, उपवन संरक्षक लडकत आदी मान्यवर उपस्थित होते.
सुपेह विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीताने प्रमुख पाहुणे, कवी आणि रसिकांचे स्वागत केले. स्वागताध्यक्ष अजित माच्छी यांनी मी घडताना या काव्य संग्रहाच्या लेखिका वीणा माच्छी यांचा जीवन प्रवाह उलगडला. कवयित्रीने काव्यक्षेत्रातील कार्य मनोगतातून व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली.
संत गाडगेबाबांचे नातू दीपक सपकाळ यांनी यवतमाळहून हजेरी लावली. साडेतीनहजार शॉर्ट फिल्म मधून क्षितिज क्रिएटर शॉर्ट फिल्मच्या ‘विथ द पीपल’ची कहाणी प्रमुख पाहुणे प्रवीण जावळे यांनी विशद करून उदयोन्मुख कलावंतांना संधी देऊ असे सांगितले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष कवी प्रवीण दवणे आणि राज्यस्तरीय काव्य संमेलनाध्यक्ष प्राचार्या आशा वर्तक यांनी भाषणातून साहित्यिक विचार मांडले. (वार्ताहर)