‘कार कार्निवल’चा जल्लोष

By admin | Published: August 20, 2016 04:41 AM2016-08-20T04:41:32+5:302016-08-20T04:41:32+5:30

‘सॉलिटेर इव्हेंटस’ने ‘लोकमत’च्या सहकार्याने कोरम मॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘कार कार्निव्हल’चे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांच्या हस्ते शुक्रवारी

The celebration of 'car carnival' | ‘कार कार्निवल’चा जल्लोष

‘कार कार्निवल’चा जल्लोष

Next

ठाणे : ‘सॉलिटेर इव्हेंटस’ने ‘लोकमत’च्या सहकार्याने कोरम मॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘कार कार्निव्हल’चे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी उदघाटन झाले. यानिमित्त ‘माय ड्रीम कार’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिस वितरणही करण्यात आले.
यावेळी ‘सॉलिटेर इव्हेंटस’चे संचालक गिरीष जैन, ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, सरस्वती इंग्लिश माध्यमिक शाळा (राबोडी)च्या अध्यक्षा मीरा कोरडे, ‘लोकमत’चे सहाय्यक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेट, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आदी उपस्थित होते. ‘काहीतरी कर ठाणेकर’ या ‘लोकमत’च्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घेतली. पालवे यांनी चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांनी आपल्या चित्रांमार्फत सुचविलेल्या रेन वॉटर हार्व्हेस्टिंग कार, सौर उर्जेवरील कार अशा वेगवेगळया संकल्पनांचेही स्वागत केले. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकते. सिट बेल्ट लावणे, हेल्मेट परिधान करणे, रस्ता ओलांडतांना घ्यावयाची काळजी अशा छोटया छोटया गोष्टींमधूनही अपघातांना आळा बसू शकतो, असा सल्लाही पालवे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सरस्वती स्कूलचा पार्थ खेडेकर (सहावी, अ), आदित्य वावटकर (५ वी, अ) आणि अंतरिक्ष मानवडकर (५ वी, ब) या तिघांना चित्रकलेतील अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे पारितोषिक मिळाले. विजय शुक्ला आणि मीरा कोर्डे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
‘कोरम मॉल’ आणि ‘लोकमत’ पार्टनर असलेला हा ‘कार कार्निव्हल’ १९ ते २१ आॅगस्टपर्यत सुरु राहणार आहे. याठिकाणी आॅडी, बीएमडब्लू, मर्सिडीज, नेक्सा, निसान,या मोटारींचे आणि हर्ले डेव्हीडसन या दुचाकींचे प्रदर्शन भरविल्याचे जैन यांनी यावेळी सांगितले. सागर अहेरवाल आणि तन्वी सिन्हा यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: The celebration of 'car carnival'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.