ठाण्यातील विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा, ट्रस्टचे अरविंद सुळे उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:50 PM2018-03-13T16:50:59+5:302018-03-14T15:40:46+5:30
अनेक चेह:यांचा समुह म्हणजे समाज. समाजातील चेह:यांवर मुखवटे असणो अटळ. तरीही काही चेह:यांना वरदान असतं, मुखवटा रहित जगण्याचं. विश्वासाचं नातं जोडण्याचं - जोपासण्याचं. या नात्याचं यंदाचं 29 वे वर्ष साजरे झाले.
ठाणे : आपल्या अंगातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या शाळेतील विशेष मुलांनी उपस्थित रसिकांची दाद मिळवली . निमित्त होते विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा २९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे . रविवारी ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या पी . सावळाराम सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्ह्यातील सोबती पॅरेण्ट असोसिएशनच्या अध्यक्षा उषा बाळ, विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे अरविंद सुळे उपस्थित होते .
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्व्लन करून झाली . या निमित्ताने केंद्रातील काही मुलांनी विविध गाण्यांवर गणेश वंदना सादर करत गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले .त्यानंतर झालेल्या पालखी नृत्यात केंद्रातील विद्यार्थी पारंपरिक वेष परिधान करून सामील झाले होते . विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होऊन त्यांनी पालखी नृत्यातील पालखी नाचवणे , पालखी खेळवणे सारखे विविध प्रकार लीलया केल्याने उपस्थित रसिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला . या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रावर आधारित डॉक्युमेंट्री दाखवत संस्थेच्या कार्य , प्रगतीचा आढावा घेण्यात आला . कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चुटकुले सादरीकरण , योगा प्रात्यक्षिके झाले . कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात वार्षिक कामगिरीचा आढावा घेत केंद्रातील मुलांना सन्मानित करण्यात आले . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास केंद्रातील मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंच्या स्टोल देखील मांडण्यात आला होता . या कार्यक्रमासाठी केंदातील मुलांचे पालक , हितचिंतक , स्नेही , ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमात विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले तर निवेदिका हर्षदा बोरकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन आपल्या ओघवत्या शैलीत केले .