सेलिब्रेटीचे लसीकरण: दोषींवर कडक कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:06 PM2021-05-30T22:06:34+5:302021-05-30T22:08:19+5:30

सेलिब्रेटी तरुणीने कोविड सेंटरची कर्मचारी असल्याचे ओळखपत्र मिळवून कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रकरण ठाणे शहरात चांगलेच गाजत आहे. याबाबत सर्व स्तरातून टीकेचा सूर उमटल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची ठाणे महापालिकेच्या आरोग्य उपायुक्त यांच्या समिती मार्फतीने चौकशी करण्याचे तसेच यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.

Celebrity Vaccination: Strict Action Order on Convicts | सेलिब्रेटीचे लसीकरण: दोषींवर कडक कारवाईचे आदेश

पालिका आयुक्तांनी नेमली उपायुक्तांची चौकशी समिती

googlenewsNext
ठळक मुद्देपालिका आयुक्तांनी नेमली उपायुक्तांची चौकशी समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सेलिब्रेटी तरुणीने कोविड सेंटरची कर्मचारी असल्याचे ओळखपत्र मिळवून कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रकरण ठाणे शहरात चांगलेच गाजत आहे. याबाबत सर्व स्तरातून टीकेचा सूर उमटल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची ठाणे महापालिकेच्या आरोग्य उपायुक्त यांच्या समिती मार्फतीने चौकशी करण्याचे तसेच यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.
सध्या लसींचा तुटवडा असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापालिकेने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केले आहे. असे असतांनाही ठामपाच्या पार्किग प्लाझा लसीकरण केंद्रात एका सेलिब्रिटी तरुणीने कोविड सेंटरची सुपरवायझर असल्याचे भासवून लस घेतल्याचे उघड झाले आहे. एकीकडे परदेशी शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना लस मिळविण्यासाठी कसरत करावी लागत असतांनाच सेलिब्रेटी तरुणीला मात्र ओमसाई आरोग्य केअर या ठेकेदार कंपनीने मात्र पार्र्किंग प्लाझाचे सुपरवायझरचे ओळखपत्र लसीकरणासाठी दिले. आता हे ओळखपत्र तिला कोणी दिले? तिला लस कशी दिली? या सर्वच प्रकरणाची आरोग्य उपायुक्तांमार्फत चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये हा चौकशी अहवाल देण्यात यावा. चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
* दरम्यान, महापालिकेचे बोधचिन्ह असलेले तसेच ओमसाई आरोग्य केअर या संस्थेच्या कर्मचाºयासाठी असलेले ओळखपत्र बनवून या सेलिबे्रटी तरुणीचे लसीकरण करण्यासाठी बनावट दस्ताऐवज बनविणाºया ओमसाई आरोग्य केअर या संस्थेचा मालक आणि कर्मचाºयाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी वर्तकनगर पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Celebrity Vaccination: Strict Action Order on Convicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.