औषधफवारणीवरून महासभेत गदारोळ, नागरिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:53 AM2018-10-06T05:53:56+5:302018-10-06T05:54:18+5:30

बदलापूर पालिका : नगरसेवकांनी व्यक्त केला संताप, शहरात साथीचे आजार

Censorship in the General Assembly, Civil Disobedience | औषधफवारणीवरून महासभेत गदारोळ, नागरिकांचा संताप

औषधफवारणीवरून महासभेत गदारोळ, नागरिकांचा संताप

Next

बदलापूर : शहरात एकीकडे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत असतानाच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या औषधफवारणीची सत्यस्थिती शुक्रवारी सभागृहात समोर आली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह आरोग्य सभापती आणि सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेकडून होणाºया औषधफवारणीच्या कामावर आक्षेप घेतला. अनेक ठिकाणी फवारणीच केली जात नसून काही प्रभागांत फवारणीचे वाहन जातच नसल्याचीही बाब यावेळी समोर आली. फवारणीच्या विषयावर पालिकेतील वातावरण चांगलेच तापले होते.

बदलापूर नगरपालिका क्षेत्रात काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढत असल्याची बाब समोर आल्यानंतर त्याचे पडसाद शुक्र वारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. सभा सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्य सभापती श्रीधर पाटील यांनी औषध आणि धूरफवारणीची कामे बंद करा. त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम होत नसल्याचा आरोप केला.
फवारणीचा कोणताही उपयोग होत नसून इतर पद्धतींचा वापर करून फवारणी करण्याचा सल्ला दिला. तर, औषधफवारणी दिखाव्यासाठी फक्त नगरसेवकांच्या घराशेजारी होते, असे सांगत भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे यांनीही फवारणीच्या प्रक्रि येवर आक्षेप घेतला.
तर, नगराध्यक्षा विजया राऊत यांनीही आपल्याही प्रभागात फवारणीचे वाहन येत नसल्याची तक्र ार केल्यावर फवारणीबाबत नगरसेवकांची नाराजी समोर आली. त्याचवेळी उपनगराध्यक्ष सुनील भगत यांनीही फवारणीचा काहीही उपयोग होत नसल्याचे स्पष्ट केले.
शीतल राऊत आणि जयप्रकाश टांकसाळकर यांनी यावेळी प्रभागानुसार व्यक्तीची फवारणीसाठी नेमणूक करण्याची मागणी
केली.
तसेच आरोग्य विभागात मदतनीस असलेल्यांची मदत घेऊन डबके तिथे फवारणी अशा पद्धतीने काम करण्याची गरज यावेळी आरोग्य सभापतींनी केली. त्यामुळे पालिकेकडून होत असलेली औषध आणि धूरफवारणी योग्यरीत्या होत नसल्याची बाब समोर आली.

प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
यावर बोलताना मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी लवकरच एक बैठक घेऊन यावर कशा पद्धतीने काम करता येईल, ते ठरवले जाईल, असे स्पष्ट केले. मात्र नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवकांच्याच प्रभागात फवारणी होत नसल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 

Web Title: Censorship in the General Assembly, Civil Disobedience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.