केंद्राची स्वच्छ सर्व्हेक्षण समिती डोंबिवलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:12 PM2018-02-24T17:12:54+5:302018-02-24T17:12:54+5:30
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ च्या माध्यमाने केंद्राची समिती शनिवारी डोंबिवली शहर परिसरात निरिक्षणासाठी आली होती. त्या समितीसमवेत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी.वेलरासू देखिल शहरात आले होते. समितीसह आयुक्त येणार म्हणुन शनिवारी मध्यरात्रीपासून विशेषत्वाने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. कुठेही कचरा दिसून नये यासाठी काळजी घेण्यात आली होती.
डोंबिवली: स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ च्या माध्यमाने केंद्राची समिती शनिवारी डोंबिवली शहर परिसरात निरिक्षणासाठी आली होती. त्या समितीसमवेत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी.वेलरासू देखिल शहरात आले होते. समितीसह आयुक्त येणार म्हणुन शनिवारी मध्यरात्रीपासून विशेषत्वाने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. कुठेही कचरा दिसून नये यासाठी काळजी घेण्यात आली होती.
शहरभर ठिकठिकाणी डीडीटी पावडरची फवारणी करण्यात आली होती, त्यामुळे ऐरव्हीपेक्षा जास्त जोमाने स्वच्छता विभाग कामाला लागला होता. एमआयडीसी परिसरासह रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता विभागाच्या कर्मचा-यांसह अधिका-यांनी कंबर कसली होती. विशेष म्हणजे स्थानक परिसरात कुठेही फेरीवाले नव्हते, त्यामुळे आयुक्त वेलरासू यांनी रोजच शहरात राऊंड मारावा अशी चर्चा पालिका वर्तूळासह नागरिकांमध्ये सुरु होती. प्रभाग अधिका-यांमध्येही प्रचंड लगबग होती. महापालिकेच्या उपइमारतीमध्येही आयुक्त येणार असल्याने चैतन्याचे वातावरण होते. शहरभर नागरिकांनी सर्व्हेक्षणात सहभागी व्हावे, आपापली मते नोंदवावी यासाठी सायकलींद्वारे जनजागृती करण्यात आली होती. सर्व्हेक्षण उपक्रमासंदर्भात महापालिकेने आधीपासूनच नागरिकांमध्ये माहिती देणे सुरु केले होते, पण समिती येणार असल्याने जनजागृतीची मोहिम जोरदार राबवण्यात आली होती. महापालिकेच्या या प्रयत्नामुळे जरी स्वच्छतेच्या यादीत काहीसा चढता क्रमांक आला तरी प्रत्यक्षात दिव्याखाली अंधार अशी स्थिती असू नये अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती. केंद्राच्या स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या निमित्ताने शहरभर राखण्यात आलेल्या स्वच्छतेचा प्रभाव कायमस्वरुपि असावा, स्वच्छता विभागानेही जशी कंबर आता कसली आहे, त्यात सातत्य ठेवावे अशीही प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त झाली.