केंद्र सरकारच्या नवीन वरसावे पुलावर पहिल्याच पावसात खड्डे 

By धीरज परब | Published: June 28, 2023 06:42 PM2023-06-28T18:42:07+5:302023-06-28T18:42:20+5:30

वेलकर पेट्रोल पंपापासून खाडी पलीकडे वसईच्या ससुनवघर यपर्यंतचा हा पूल लांबीला सुमारे सव्वादोन किमी इतका आहे.

Central government's new Varasave bridge potholes in the first rain | केंद्र सरकारच्या नवीन वरसावे पुलावर पहिल्याच पावसात खड्डे 

केंद्र सरकारच्या नवीन वरसावे पुलावर पहिल्याच पावसात खड्डे 

googlenewsNext

मीरारोड -  मुंबई अहमदाबाद महामार्गावरील १५७ कोटी खर्चून नव्याने बांधलेला वरसावे पुल ३ महिन्यापूर्वी वाहनांसाठी खुला केला असताना पहिल्याच पावसात त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे भरधाव वाहने चालवताना अपघाताचा धोका वाढला असून कामाच्या सुमार दर्जाची पोलखोल झाल्याचा आरोप होत आहे. 

वरसावे येथील खाडीवर मुंबई व ठाण्या कडून येणाऱ्या व वसई - गुजरात आदी दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी भलामोठा ४ पदरी पूल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून बांधण्यात आला आहे. नवीन पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर २८ मार्चला नवीन वर्सोवापूल वाहनांना खुला करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून दिली होती. 

वेलकर पेट्रोल पंपापासून खाडी पलीकडे वसईच्या ससुनवघर यपर्यंतचा हा पूल लांबीला सुमारे सव्वादोन किमी इतका आहे. नवीन पूल सुरु होऊन तीन महिने होत नाही तोच पुलाच्या पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नवीन पूल आणि पावसाळा आता कुठे सुरु होत नाही तोच पुलावर ठिकठिकाणी डांबर उखडून मोठे खड्डे पडले आहेत.  

सदर पुलावर वाहने सुसाट असताना खडडे पडल्याने अपघाताची आणि जीवित हानीची भीती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हे काम असल्याने नवीन पुलाला पडलेल्या खड्डयां वरून आता टीकेची झोड उठू लागली आहे. नागरिकांनी देखील नवीन पुलावर पडलेल्या खड्डयांबद्दल संताप व्यक्त केला आहे. सदर खड्डे त्वरित बुजवावेत व संबधित कामाची चौकशी करून कारवाईची मागणी होत आहे. या आधी देखील खासदार राजन विचारे व खासदार राजेंद्र गावित सह विविध पक्ष व नेत्यांनी पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत आरोप केले होते. 

Web Title: Central government's new Varasave bridge potholes in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.