उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाने ५०० ग्राम वजनाच्या मुलाला दिले जीवदान

By सदानंद नाईक | Published: September 29, 2023 04:14 PM2023-09-29T16:14:19+5:302023-09-29T16:15:39+5:30

उल्हासनगर शेजारील अंबरनाथ जुना गायकवाड पाडा येथील ममता निकम नावाच्या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने, ती उपचार करण्यासाठी ३ महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली.

Central hospital in Ulhasnagar gave life to a child weighing 500 grams | उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाने ५०० ग्राम वजनाच्या मुलाला दिले जीवदान

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाने ५०० ग्राम वजनाच्या मुलाला दिले जीवदान

googlenewsNext

उल्हासनगर - मध्यवर्ती रुग्णालयात ममता निकम या महिलेची कमी दिवसात प्रसूती होऊन ५०० ग्राम वजनाच्या बाळाला जन्म दिला. डॉक्टर व नर्सनी नवजात शिशुकक्षात बाळावर तीन महिने यशस्वी उपचार केल्याने, बुधवारी बाळाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यावेळीं बाळाचे वजन २ किलो व तब्येत सुदृढ झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

उल्हासनगर शेजारील अंबरनाथ जुना गायकवाड पाडा येथील ममता निकम नावाच्या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने, ती उपचार करण्यासाठी ३ महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली. ६ महिन्याची गर्भवती असणाऱ्या ममता निकम हिने उपचारा दरम्यान कमी दिवसाच्या बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळाचे वजन अवघे ५०० ग्राम असल्याने, बाळाच्या तब्येतीबाबत कुटुंबासह डॉक्टर्स व नर्स यांच्या समोर यक्षप्रश्न उभा ठाकला होता. मात्र आईला मुला विषयी असलेले प्रेम व लळा बघून नवजात शिशु कक्षातील डॉक्टर वसंतराव मोरे, डॉ वैशाली पवार, डॉ किरण बनसोडे, डॉ आझम खान, डॉ पूजा यादव, नर्स जयश्री शिंदे, गौरी केलसिकर आदींनी सतत ३ महिने मेहनत घेऊन बाळाला पुनर्जन्म दिला. यादरम्यान बाळाच्या डोळ्याला संसर्ग झाल्याने, त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी होत असून वर्षाला ६ हजार पेक्षा जास्त बाळांचा जन्म होतो. २०२ बेडची क्षमाता असलेल्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. तर नवजात शिशु कक्षाची क्षमता १० बालकांची असतांना सरासरी १५ पेक्षा जास्त मुलांवर उपचार होत असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली.

असुविधेवर मात
 मध्यवर्ती रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाची क्षमता १० बालकांची असून व्हेंटिलेटरची सुविधा नाही. आदी अपुऱ्या सुविधेवर डॉक्टरांनी मात करून बाळाची तब्येत ठणठणीत करून घरी सुखरूप पाठविले आहे.

आईच्या जिद्दीला सलाम
 ममता निकम या महिलेची ६ महिण्यात प्रसूती होऊन अवघ्या ५०० ग्राम बाळाला जन्म दिल्याने, कुटुंबानी बाळाच्या जगण्याची आशा सोडली होती. मात्र आईच्या जिद्दीला डॉक्टर व नर्सनी सलाम ठोकून उपचार केले.

Web Title: Central hospital in Ulhasnagar gave life to a child weighing 500 grams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.