मध्यवर्ती रुग्णालयात नो केस पेपर व रांगा, महापालिका अंटेलिया येथील रुग्णालयावर मध्यवर्ती रुग्णालयाचा दावा?
By सदानंद नाईक | Published: September 8, 2023 03:19 PM2023-09-08T15:19:56+5:302023-09-08T15:20:25+5:30
Ulhasnagar: मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची हेडसांड होऊ नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी केस पेपर थेट संबंधित डॉक्टरकडे उपलब्ध करून दिला.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची हेडसांड होऊ नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी केस पेपर थेट संबंधित डॉक्टरकडे उपलब्ध करून दिला. यामुळे रुग्णांचा रांगेचा त्रास वाचून त्यांची हेडसांड थांबल्याचे चित्र रुग्णालयात आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय रुग्णांनी ओव्हरफलो झाले असतांना, आलेल्या रुग्णांना सेवा देता याव्या म्हणून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आरोग्य विभागाने केस पेपर फ्री केल्याने, रुग्णांना केस पेपरसाठी रांगा लावण्याची गरज नाही. संबंधित डॉक्टरांच्या कॅबिन समोर उभे राहिल्यास, तेथेच केस पेपर देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. यामुळे आलेल्या रुग्णांचा त्रास वाचून ज्या डॉक्टरांना भेटायचे आहे. त्यांना थेट भेटता येते. तसेच आदी १० रुपयाला मिळणार केश पेपर फ्री केल्याने, रुग्णांना दिलासा मिळाला आहे. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे रुग्णालयात मोफत दिली जातात. एकूणच गोरगरीब व गरजू नागरिकांना रुग्ण सेवा घेण्यात कोणतीच अडचण येत नाही.
महापालिका रुग्णालयावर दावा?
मध्यवर्ती रुग्णालयाचे स्ट्रॅक्टरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. स्ट्रॅक्टरल ऑडिट अहवाल काय येतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून रुग्णालयाची दुरुस्ती सुचविल्यास, रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून, महापालिकेचे रिजेन्सी-अंटेलिया येथे बंद अवस्थेत असलेले २०० खाटाचे अद्यावत रुग्णालय वापरण्यासाठी देण्याची मागणी मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी महापालिका आयुक्ताकडे लेखी आहे. महापालिकेने रुग्णालय सुरू करण्यासाठी कोट्यावधीच्या किंमतीतून साहित्य खरेदी केले. मात्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्णालय गेल्या ३ वर्षांपासून बंद असल्याने, रुग्णालयाचे साहित्य भंगारात निघाल्याचे बोलले जाते. कोट्यवधींचे साहित्य भंगारात जाणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महापालिका रुग्णालयाचे खाजगीकरण
शहरातील डॉक्टर्स, राजकीय नेत्यांचा विरोध डावलून महापालिका रिजेन्सी-अंटेलिया येथील रुग्णालय एका खाजगी रुग्णालयाला चालविण्यासाठी देण्याचा घाट असल्याची टीका होत आहे. ९ लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेने स्वतःचे रुग्णालय बांधल्यानंतर, त्याचे खाजगीकरण करणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.