पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना केंद्रीय पदक; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 01:22 PM2022-08-13T13:22:30+5:302022-08-13T13:25:01+5:30

चार आरोपीना उत्तर प्रदेश मधून तर एकास नालासोपारा येथून पकडण्यात आले होते.

Central Medal to Police Inspector Jitendra Vanakoti; From the Union Ministry of Home Affairs | पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना केंद्रीय पदक; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गैरव

पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना केंद्रीय पदक; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गैरव

Next

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना सशस्त्र दरोड्याच्या उत्कृष्ट तपासा प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केंद्रीय गृहमंत्री पदक मंजूर करून गौरवण्यात आले आहे. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ४ मधील एस कुमार गोल्ड ह्या सराफा पेढीवर ७ जानेवारी २०२१ रोजी पिस्तूल चा धाक दाखवत ९५ लाख ५० हजारांचे दागिने दरोडेखोरांनी लुटून नेले होते . त्यावेळी गुन्हे शाखेचे निरीक्षक असलेल्या वनकोटी व पथकाने ह्या दरोड्याच्या गुन्ह्याचा कसून तपास करत ५ आरोपीना शोधून काढले.

चार आरोपीना उत्तर प्रदेश मधून तर एकास नालासोपारा येथून पकडण्यात आले होते. त्यांच्या कडून  ३१ लाखांचे दागिने, १४ लाख रोख, एक रिव्हॉल्व्हर , एक देशी बनावटीचा कट्टा व ३७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती.  अटक आरोपी हे सराईत असून अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मकोका  अन्वये कारवाई करण्यात येऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले . ह्या गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्या बद्दल वनकोटी यांना केंद्रीय पदक मंजूर झाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे . 

Web Title: Central Medal to Police Inspector Jitendra Vanakoti; From the Union Ministry of Home Affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.