Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:27 AM2019-04-04T08:27:19+5:302019-04-04T09:59:28+5:30

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.

Central railway Commuters protest at diva station train arrives late | Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको

Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको

ठळक मुद्देदिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांविरोधात संतप्त महिलांनी रेल रोको केला आहे.मुंबईकडे जाणारी लोकल अडवल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

ठाणे -  ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे गुरुवारी (4 एप्रिल) मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांविरोधात संतप्त महिलांनी रेल रोको केला आहे. मुंबईकडे जाणारी लोकल अडवल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक रखडली आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या गर्दी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकात दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांविरोधात संतप्त झालेल्या इतर महिला प्रवाशांनी रेल रोको केला आहे. कर्जत, कसारा, कल्याण येथून सुटणाऱ्या लोकल दिवा रेल्वे स्थानकात थांबतात. मात्र, काही प्रवासी लोकलचा दरवाजा अडवून ठेवतात. त्यामुळे दिवा स्थानकात लोकलमध्ये प्रवाशांना चढता येत नाही. असाच प्रकार गुरुवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार येथे घडला. महिला डब्यातील काही प्रवाशांनी दरवाजा अडवून ठेवल्यामुळे दिवा स्थानकातील महिलांना डब्यात चढता आलं नाही. दिवा स्थानकात सकाळी 6.56 मिनिटांनी मुंबई सीएसएमटीला जाणारी जलद लोकल आली असता, या लोकलमधील महिलांच्या डब्यात दरवाजात उभ्या असलेल्या महिलांनी दिव्यातील महिला प्रवाशांना डब्यात प्रवेश करून दिला नाही. यामुळे दिव्यातील महिलांना याचा संताप आल्याने दरवाजात उभे असलेल्या महिलांना दिव्यातील महिलांनी खाली खेचले आणि लोकलच्या मोटरमनला सांगून रेल्वे रुळावर महिला उतरल्या. 

दिवा रेल्वे स्थानकात संतप्त झालेल्या महिलांनी काही वेळ लोकल रोखून धरण्याचा प्रयत्न केला आहे. लोकलसमोर महिलांनी उभे राहून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. तसेच मुंबईच्या दिशेने येणारी लोकल महिला प्रवाशांनी पंधरा मिनिटे लोकल रोखून धरली होती. यामुळे गुरुवारी सकाळीच मध्य रेल्वेची अप मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. रेल रोको झाल्याची माहिती दिवा स्थानकातील पोलिसांना समजताच पोलिसांनी महिलांना दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिला रुळांवरून बाजूला झाल्या आणि लोकल मुंबईकडे मार्गस्थ झाली. या रेल रोकोचा फटका मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. कल्याण, डोंबिवलीहून दररोज सकाळी हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करतात. मात्र आज सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


दिवा स्थानकात सकाळी थांबणाऱ्या सर्व जलद लोकल या कर्जत, कसारा येथून सुटणाऱ्या असल्याने त्या प्रवाशांनी गच्च भरून येतात त्यामुळे दिव्यातील प्रवाशांना या जलद गाड्यांचा काही एक फायदा झालेला नाही. दरवाजा अडवून दादागिरी करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अशा घटना घडत आहेत. रेल रोको करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा दरवाजा अडवणाऱ्या व दादागिरी करणाऱ्यांवर आधी कारवाई करा. अन्यथा दिवा स्थानकात कधीही प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो.

- दिव्या मांडे ( सचिव, दिवा रेल्वे प्रवासी संघटना )


 

Web Title: Central railway Commuters protest at diva station train arrives late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.