VIDEO: मुलगा फलाटावरून पडताच अंध महिलेचा आक्रोश; तितक्यात समोरून आली भरधाव ट्रेन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:20 AM2021-04-19T11:20:13+5:302021-04-19T11:35:35+5:30
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; लहान मुलाचा जीव रेल्वे कर्मचाऱ्यानं वाचवला
अंबरनाथ: रेल्वेच्या पॉइंटमनने प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले आहेत. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे.
शनिवारी एक अंध महिला रेल्वे स्थानकावर उभी होती. अचानक तिच्याजवळचा लहान मुलगा हा रेल्वे ट्रॅक वर पडला. त्याच वेळेस 5 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास उद्यान एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर येत होती. घाबरलेली ती अंध महिला आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. मात्र फलाटाचा अंदाज येत नसल्याने ती चाचपडत होती. त्याच वेळेस ड्युटीवर असलेला पॉइंटमन मयूर शेळके हा ट्रॅकमधून तिथे धावत आला आणि त्याने क्षणार्धात त्या मुलाला फलाटावर उचलून स्वतःही फलाटावर गेला.
तुमच्या धैर्याला, तत्परतेला सलाम! पॉईंटमन मयूर शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले लहान मुलाचे प्राण; वांगणी रेल्वे स्थानकातील घटना https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/s99PExnqvo
— Lokmat (@MiLOKMAT) April 19, 2021
मयूर शेळके यांच्या सतर्कतेमुळे या मुलाचे प्राण वाचले. जीवावर उदार होऊन मयूर शेळके याने या चिमुकल्याचे जीव वाचवला. क्षणाचाही विलंब झाला असता तर शेळके आणि त्या मुलाचा जीव जागीच गेला असता. मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाला जीवदान देणाऱ्या शेळकेच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक सुरू आहे.