डंपरनं रेल्वे गेटला धडक दिल्यानं तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 06:29 AM2020-01-03T06:29:50+5:302020-01-03T06:41:06+5:30
कल्याणहून मुंबईकडे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प
Next
ठाणे: टिटवाळा ते आंबिवलीच्या दरम्यान विद्युत वायर तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामाला जाण्यासाठी निघालेल्या हजारो लोकांचे हाल होणार आहेत. सकाळी लवकर कार्यालयात जाण्यासाठी निघालेले अनेक जण रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं टिटवाळा ते कल्याण दरम्यान रिक्षानं प्रवास करत आहेत. मात्र प्रवाशांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन काही रिक्षा चालकांनी ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारण्यास सुरुवात केली आहे.
A road vehicle has dashed the level crossing boom which resulted touching the OHE near Ambivali. Staff working on to restore services. Kindly bear with us.
— Central Railway (@Central_Railway) January 3, 2020
वाळूच्या डंपरने रेल्वे गेटला धडक दिल्यानं कसारा ते कल्याण अप डाऊन वाहतूक बंद असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिली. डंपर धडक दिल्यामुळे ओव्हरहेड वायरमधून होणारा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आंबिवलीजवळ लोकल अर्ध्या तासापासून रखडली आहे. कल्याणहून मुंबईकडे होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांनादेखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.