Central Railway : कर्जत-भिवपूरी दरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 10:25 AM2019-01-09T10:25:40+5:302019-01-09T10:45:30+5:30
मध्य रेल्वेची पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत-भिवपूरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
ठाणे - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (9 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. कर्जत-भिवपूरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कर्जतवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा फटका सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेसला बसला असून सिंहगड एक्स्प्रेस कर्जत स्थानकाजवळ रखडल्याची माहिती मिळत आहे.
रुळाला तडे गेल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. याआधी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी (2 जानेवारी) मुंबईकरांचे हाल झाले होते. शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
मध्य रेल्वेची पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत, कर्जत-भिवपूरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडा, सिंहगड एक्स्प्रेस रखडली #CentralRailway
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 9, 2019