Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, 13 ट्रेनचा मार्ग बदलला, दोन ट्रेन रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 12:52 PM2019-07-27T12:52:16+5:302019-07-27T12:58:20+5:30
काल संध्याकाळपासून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला आहे.
कल्याण - काल संध्याकाळपासून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला आहे. उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे अंबरनाथ परिसरात रेल्वे रुळांवर पाणी आले असून, त्यामुळे मध्य रेल्वेच्या 13 ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर 6 रेल्वे गाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबवण्यात आला आहे. तर दोन ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेचे पीआरओ सुनील उदासी यांनी रेल्वेच्या वाहतुकीविषयीची माहिती देताना सांगितले की, उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे मध्य रेल्वेच्या 13 ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर 6 रेल्वे गाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबवण्यात आला आहे. तर दोन ट्रेन रद्द करण्यात आल्या.''
Sunil Udasi, Chief Public Relations Officer, Central Railway: 13 trains diverted, 6 short-terminated and 2 cancelled due to heavy rainfall and overflowing Ulhas river resulting in water logging at Ambernath. #Maharashtra
— ANI (@ANI) July 27, 2019