रामदास आठवले यांच्या बैठकीकडे सेंच्युरी रेयॉनच्या अधिकाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:21+5:302021-08-28T04:44:21+5:30
कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अलीकडेच सह्याद्री ...
कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अलीकडेच सह्याद्री अतिथी गृहावर कामगार प्रतिनिधींसोबत बोलावलेल्या बैठकीकडे सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या प्रतिनिधींनी चक्क पाठ फिरवली. त्यामुळे यापुढील बैठक दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कामगारमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली जाईल, असे आठवले यांनी कामगार प्रतिनिधींना सांगितले.
एनआरसी कंपनीने २००९ मध्ये टाळेबंदी लागू केली. कंपनीतील साडेचार हजार कामगारांची थकीत देणी प्रलंबित आहेत. कामगारांनी २ हजार ५०० कोटी थकीत रक्कम देण्याचा दावा केला आहे. कंपनीची साडेचारशे एकर जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. जागेचा ताबा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, नॅशनल कंपनी लॉ लवादाच्या मुंबई कार्यालयाने कामगारांना ६४ कोटींची देणी देण्याचा निर्णय दिला आहे. त्यात वाढ करून अदानीने १०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. कामगारांना हा निर्णय मान्य नसल्याने लवादाच्या दिल्ली कार्यालयात कामगारांची याचिका प्रलंबित आहे. त्याची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. आठवले यांची कामगार प्रतिनिधी उदय चौधरी, जे. सी. कटारीया, भीमराव डोळस, अविनाश नाईक, सुभाष पाटील, रामदास वळसे पाटील यांनी भेट घेतली.
..............
वाचली.