ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी डॉ. भाऊसाहेब दांगडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 10:47 PM2020-11-27T22:47:00+5:302020-11-27T22:48:17+5:30
Dr. Bhausaheb Dangde : डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते रायगड येथे जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते रायगड येथे जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील रहिवासी आहेत.
डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी मुंबई येथून बी. व्ही. एस. सी. अँड एच. ही पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे. यापूर्वी त्यांनी जळगाव आणि श्रीरामपूर प्रांत अधिकारी, उप जिल्हाधिकारी धुळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अहमदनगर, निवासी उप जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक म्हणून सेवा बजावली आहे.
२०११ साली त्यांना पदोन्नती मिळून ते अप्पर जिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी कोकण गृह निर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे सेवा बजावली. त्यानंतर कोकण विभाग महसूल उपायुक्त पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे.