Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या विपश्यना केंद्रास पर्यावरण पूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र

By धीरज परब | Published: February 15, 2023 04:08 PM2023-02-15T16:08:41+5:302023-02-15T16:09:34+5:30

Mira Bhayander: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या रामदेव पार्क भागात असलेल्या विपश्यना केंद्र अर्थात  मेडीटेशन सेंटर इमारतीला भारतीय हरित इमारत परिषद तर्फे पर्यावरणपूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Certificate as Environmentally Complementary Green Building to Vipassana Center of Mira Bhayander Municipal Corporation | Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या विपश्यना केंद्रास पर्यावरण पूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र

Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या विपश्यना केंद्रास पर्यावरण पूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र

Next

- धीरज परब 
मीरारोड -  मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या रामदेव पार्क भागात असलेल्या विपश्यना केंद्र अर्थात  मेडीटेशन सेंटर इमारतीला भारतीय हरित इमारत परिषद तर्फे पर्यावरणपूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे . असे प्रमाणपत्र मिळालेली शहरातील हि पहिली इमारत आहे . 

पालिकेने दिलेल्या माहिती नुसार, मीरारोडच्या रामदेव पार्क भागात उभारलेल्या ह्या मेडिटेशन सेंटर इमारती विविध हरित उपायांचा समावेश करण्यात आला . सदर मेडीटेशन सेंटर इमारत ६ हजार ६१२ चौ.मी. क्षेत्र भुखंडावर बांधलेली असून बांधकाम क्षेत्र १ हजार  चौ. मीटर तर लँड्सकॅप क्षेत्र २ हजार ८३९ चौ. मीटर एवढे आहे. सदर इमारत तळ अधिक एक मजल्याची असून ५००  लोकांच्या क्षमतेचे बहुउद्देशिय सभागृह, कॉन्फरन्स हॉल, वॉचनालय, लहान सभागृह इ. सुविधा सदर इमारतीत आहेत.

प्रदुषण कमी करणे, पाणी, उर्जेची बचत करणे, चांगले वातावरण उपलब्ध करणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला. सदर ठिकाणी वेगाने वाढणारी ५५ झाडे ४३ % क्षेत्रावर स्थानिक प्रजातीची झुडपे यासह लॅडस्केपिंग करण्यात आले. शुद्ध हवा पुरवठ्याच्या तरतुदीसह उच्च कार्यक्षमता असलेली वातानुकूलित यंत्रणा बसवून सभागृह व इतर सुविधा ठिकाणी हवेशीर वातावरणासह पर्यावरण अनुकूल उपाययोजना राबविण्यात आली.

पाण्याची बचत करण्यासाठी स्वच्छता गृहात ड्युएल फ्लश, लघुशंका ठिकाणी प्रेसमॅटिक फ्लश, लो फ्लो हेल्थ नळ आणि वॉश बेसिन टॅप सारखी यंत्रणा बसवून ३०.४९ % इतकी पाण्याची बचत करण्यात आली. इमारतीचे छप्पर बांधण्यासाठी इन्सुलेटींग सामुग्रीचा वापर केल्याने ४० % उर्जाबचतीचे ध्येय साध्य केले असून इमारतीत जास्तीत जास्त काचेचा वापर करुन नैसर्गिक प्रकाशाची व्यवस्था होऊन दिवसभर पुरेसा प्रकाश मिळतो .  ७६ . ६९ % स्वच्छ आकाशातुन दिवसाच्या प्रकाशाची पातळी गाठली जाते. जेणेकरून विजेचा कमीत कमी वापर होत आहे . इमारतीत १०० % एल.ई.डी. लाईट्सचा वापर केलेला आहे.

सदर प्रकल्पात बांधकाम साहित्य अंतर्गत टाटा टिस्कॉन, स्टील बार, कुत्रिम वाळू, दर्जेदार पेट्स इ. ग्रीन उत्पादने वापरली आहेत. सुका कचरा ओला कचरासाठी इमारतीमध्ये विविध ठिकाणी विलगीकरण डब्बे बसविण्यात आले आहेत. विविध ठिकाणी नो स्मोकिंग धोरणानुसार नोस्मोकिंगची चिन्हे लावण्यात आली आहेत. सदर प्रकल्पात इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग सुविधा देण्यात आलेली आहे.  माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पालिकेने हरित इमारतीचा निर्णय घेतला. 

भारतीय हरित इमारत परिषदच्या हरित इमारत श्रेणी अंतर्गत सदर इमारत प्रकल्पाचे पुनर्विलोकन केल्या नंतर  हरित इमारतीचे प्रमाणपत्र महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना परिषदे तर्फे देण्यात आले आहे .   सदर हरित इमारतीसाठी शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितिन मुकणे, उप अभियंता यतिन जाधव यांनी विशेष मेहनत घेतल्याबद्दल आयुक्त ढोले यांनी त्यांचे कौतुक केले .  अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे, रवी पवार व कल्पिता पिंपळे, जनसंपर्क अधिकारी राज घरत आदी उपस्थित होते.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विकासकांनी सुद्धा नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती या हरित इमारत संकल्पनेतून बांधून भारतीय हरित इमारत परिषदेस पर्यावरण पूरक व वसुंधरा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त ढोले यांनी केले आहे . 

Web Title: Certificate as Environmentally Complementary Green Building to Vipassana Center of Mira Bhayander Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.