शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात

By सुरेश लोखंडे | Published: April 1, 2024 05:50 PM2024-04-01T17:50:39+5:302024-04-01T17:51:17+5:30

ठाणे, पालघर व मुंबई परिसरातील हाजारो भावीक भावसे येथील या कोकण मढीच्या या यात्रा उत्सव व पालखी सोहळ्याला उपस्थित हाेते...

Chaitanya Kanifnath Siddha Samadhi Mandir Yatrotsav to Shahapur in jubilation | शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात

शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात

ठाणे : शहापूर तालुक्यातील भावसे गावात ८१ वर्षा पासून रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथ महाराज सिध्द समाधी मंदीर (कोकण मढी) येथे यात्रा उत्सव पार पडत आहे. यदाही मंदीराचे मुख्य पुजारी गुरूवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गर्दर्शानाने रविवारी हा यात्राउत्सव जल्लाेषात भक्तीभावे पार पडला.             

ठाणे, पालघर व मुंबई परिसरातील हाजारो भावीक भावसे येथील या कोकण मढीच्या या यात्रा उत्सव व पालखी सोहळ्याला उपस्थित हाेते. रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे रविवारी हा साेहळा पार पडला. यावेळी सकाळी समाधी अभिषेक झाला. त्या नंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम व पारंपारीक देव गाण्याचा कार्यक्रम पार पडला. सायंकाली नाथसरकार ढोलताशा पथक, कानीफनाथ सेवा मंडळ पारंपारीक भजन व बॅान्जोच्या गजरात पालखी सोहळा निघाला. या साेहळ्यात नाथांच्या मानाच्या काठ्या व ताईत भरण्याचा कार्यक्रम पारपडला. गाव कमीटीने लावणीचा कार्यक्रम आयेजीत केला होता.
 

Web Title: Chaitanya Kanifnath Siddha Samadhi Mandir Yatrotsav to Shahapur in jubilation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे