आईचा मुलावर चाकूहल्ला

By admin | Published: January 9, 2017 06:48 AM2017-01-09T06:48:07+5:302017-01-09T06:48:07+5:30

पती व्यवसाय करत नसल्याने घरखर्चात अडचणी वाढल्याने चिडलेल्या पत्नीने पतीला शिवीगाळ करत

Chakahala mother's son | आईचा मुलावर चाकूहल्ला

आईचा मुलावर चाकूहल्ला

Next

भिवंडी : पती व्यवसाय करत नसल्याने घरखर्चात अडचणी वाढल्याने चिडलेल्या पत्नीने पतीला शिवीगाळ करत मुलाला घेऊन घरातून चालते व्हा, असा दम भरला. यावरून पतीपत्नीमध्ये भांडण होऊन संतापलेल्या आईने सात वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केला. ही घटना खदाण रोड येथे घडली.
हल्लेखोर आईला पोलिसांनी गजाआड केले आहे. साई कुंभार असे या मुलाचे नाव आहे. त्याची आई रेश्मा (३०) हिचे पती आकाश याच्याशी कामावरून कडाक्याचे भांडण झाले.
या वेळी रेश्मा हिने पती आकाश व मुलगा साई या दोघांना घरातून निघून जाण्यास सांगितले. त्यावरून झालेल्या भांडणातून रेश्मा हिने
चाकू घेऊन साईवर वार केले. यात  तो गंभीर जखमी झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chakahala mother's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.