चाकरमान्यांची 'रूळावरची कसरत'! कोकणात जाण्यासाठी जीव धोक्यात घालून ट्रेन पकडण्याची धडपड (Video)
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 02:32 PM2023-09-17T14:32:20+5:302023-09-17T14:33:19+5:30
गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची दिवा स्थानकात प्रचंड गर्दी
विशाल हळदे, ठाणे: यंदा गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर कोकणरेल्वेने प्रथमच दिवा ते रत्नागिरी दिवा अशी मेमू ट्रेन सुरू केलीय. 13 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या मेमु सेवेला कोकणातील चाकरमानी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी ही मेमु दिवा स्थानकातून रवाना होण्याआधी फलाटात शिरतानांची ही दृश्य आहेत. रेल्वे फलाटावर तर गर्दी आहेच, मात्र रुळांवर सुद्धा प्रवशी उतरून मेमुत चढण्यासाठी तयार आहेत. कोकण रेल्वे असेल किंवा मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडण्यात आल्यात, मात्र त्यासुद्धा कमी पडतायत हेच या दृष्यातून दिसून येतंय.
कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची दिवा स्थानकात प्रचंड गर्दी
— Lokmat (@lokmat) September 17, 2023
- जीव धोक्यात घालून प्रवास
- प्लॅटफॉर्म सोबतच रेल्वे रूळावरही गर्दी
- ट्रेनमध्ये चढण्यासाठी कसरत
(व्हिडीओ- विशाल हळदे)#LokmatNews#indianrailway#Konkan#LifeinDangerpic.twitter.com/FjHDloNRZM
कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर ठाणे इथल्या चाकरमान्यांना मेमु सोयीची असल्याने गावी जाण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याच दिसून येतंय. इतकी गर्दी की पोलिसांना आवरतानाही नाकीनऊ येत होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नाने गर्दी नियंत्रित करत प्रवाशांनी खचाखच भरलेली मेमु दिव्यातून रवाना झाली. अजूनही अनेक चाकरमानी अन्य ट्रेनच्या प्रातिक्षेत दिवा स्थानकावर आहेत.