मुंबई-नाशिक महामार्गावर चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:09+5:302021-06-27T04:26:09+5:30

भिवंडी : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शनिवारी खासदार कपिल पाटील व ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर ...

Chakka jam agitation on Mumbai-Nashik highway | मुंबई-नाशिक महामार्गावर चक्का जाम आंदोलन

मुंबई-नाशिक महामार्गावर चक्का जाम आंदोलन

Next

भिवंडी : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शनिवारी खासदार कपिल पाटील व ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर यांच्या नेतृत्वाखाली रांजणोली नाका येथील मुंबई-नाशिक महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्याच बरोबर शहरात कल्याण नाका परिसरात आमदार महेश चौघुले व शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. तसेच भविष्यात शैक्षणिक आणि नोकरीमधील आरक्षणही रद्द होण्याची शक्यता असल्याचे भाजपने म्हटले आहे. आंदोलनकर्त्यांनी आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, यशवंत सोरे, महादेव घाटाळ, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष आणि पंचायत समितीचे उपसभापती गुरुनाथ जाधव, विनोद ठाकरे, रामनाथ पाटील, छत्रपती पाटील, जितेंद्र डाकी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील, श्रीकांत गायकर, नीलेश गुरव, प्रमोद पाटील आदी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Chakka jam agitation on Mumbai-Nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.