बाप्पांच्या स्वागतासाठी चाकरमानी निघाले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:32 AM2019-08-28T00:32:26+5:302019-08-28T00:32:38+5:30

पाच दिवसांत लालपरीच्या ८२३ फेऱ्या : ७७६ गाड्या हाउसफुल्ल, शनिवारी सर्वाधिक ५८५ फेºया

Chakramani left for the village to welcome ganpati | बाप्पांच्या स्वागतासाठी चाकरमानी निघाले गावाला

बाप्पांच्या स्वागतासाठी चाकरमानी निघाले गावाला

Next

पंकज रोडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गौरी-गणपतीसाठी चाकरमान्यांना गावी सुखरुप नेण्यासाठी लालपरी सज्ज झाली आहे. यानुसार ८२३ जादा फेºया सोडण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागाने घेतला असून आतापर्यंत ७७६ फेऱ्यांचे बुकिंग झाले आहे. मागणी वाढल्यास फेºया वाढवण्यात येणार आहेत. त्यातच बुधवारपासून (आज) चाकरमानी गावी निघणार असून ३१ आॅगस्टला सर्वाधिक ५८५ जादा फेºया होणार असल्याने परिवहन विभागाची मोठ्याप्रमाणात धावाधाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दिवशी चाकरमान्यांची बस चुकू नये यासाठी विशेष आॅपरेशन राबवले जाणार आहे.
यंदा गणेश चतुर्थी येत्या २ सप्टेंबर रोजी असल्याने त्यानिमित्त कोकणात जाणाºया गणेश भक्तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तर कोकणात जाण्याकरीता एसटीच्या ठाणे विभागामार्फत गतवर्षापेक्षा यंदाही योग्यरित्या जादा फेºयांचे सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, तरीसुद्धा आणखी जादा बस सोडण्याची तयारी करून ठेवल्याचे विभागाकडून सांगण्यात येते. ठाणे विभागातील ९ आगारातून २८ आॅगस्ट ते ०१ सप्टेंबर दरम्यान या जादा फेºया सोडण्यात येणार आहेत.
या जादा गाड्यांचे आरक्षण संगणकीय आरक्षण पद्धत उपलब्ध करून दिली. ते एक महिना अगोदरपासून उपलब्ध करून दिले आहे. तसेच ग्रुप पद्धतीचे आरक्षण ४० दिवस आधी सुरू झाले असून त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर परतीच्या आरक्षणासाठी व्यवस्था तत्काळ उपलब्ध करून दिले असून परतीचा प्रवास हा ८ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती विभागाने दिली.
३१ आॅगस्टला सुटणाºया ५८५ बस बुक
च्कोकणात जाण्यासाठी २८ आॅगस्ट ते १ सप्टेंबर असे पाच दिवस जादा बस सोडण्यात येणार आहेत. २८ आॅगस्टला बुधवार असून अवघ्या दोन जादा बस सुटणार आहेत. तर २९ आॅगस्टला २४, ३० आॅगस्टला १२२, ३१ आॅगस्ट या दिवशी सर्वाधिक ५८५ तर १ सप्टेंबर रोजी सध्यातरी ९० एसटी बस सोडण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर नियमित २२ बस ही धावणार आहेत.

रत्नागिरीकर आघाडीवर : बाप्पांच्या स्वागतासाठी बुकींग करणाºयांमध्ये रत्नागिरीकर आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ दापोली, गुहागर, चिपळूण आणि खेड येथील चाकरमानी आहेत.

३१ आॅगस्टला खरी कसरत : ३१ आॅगस्टला सध्या ५८५ बसेस बुक झाल्या आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसात विशेष आॅपरेशन एसटी विभागामार्फत राबवले जाते. जेणे करून बसमध्ये जागा बुकींग केलेल्या चाकरमान्याला त्याच्या बसपर्यंत सहज पोहोचता येईल, हा त्या मागचा उद्देश असतो. त्यामुळे या दिवशी खºया अर्थाने कसरत आहे. गणेशोत्सवाच्या काळात जनरल आणि गणपतीसाठी सोडण्यात येणाºया गाड्यांसाठी स्वंतत्र व्यवस्था केली जाते. त्यामुळे या गाड्यांशी नियमित गाडयांचा काही संबंध येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ग्रुपद्वारेच ३७७ बस फुल : चाकरमान्यांचा ग्रुप बुकिंग करण्याकडे जास्त कल असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ग्रुपने ३७७ बस बुकिंग केल्या आहेत.त्यात राजकीय मंडळींचा भरणा अधिक आहे. ग्रुपमुळे त्यांना एसटी डेपो येण्याची गरज नाही. तसेच त्या ग्रुपने निश्चित केलेल्या ठिकाणापासून बस थेट गावाला नेली जाणार आहे.

Web Title: Chakramani left for the village to welcome ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.