चल रे ए सीएमवाल्या..., भाजपा पदाधिकाऱ्याच्या भावाला दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:27 AM2018-04-30T03:27:55+5:302018-04-30T03:27:55+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून ५०० रुपयांचा दंड आकारल्यानंतर त्याची पावती मागणाºया नवी मुंबईतील राकेश पांडेय यांना ठाण्यातील वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर
ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून ५०० रुपयांचा दंड आकारल्यानंतर त्याची पावती मागणाºया नवी मुंबईतील राकेश पांडेय यांना ठाण्यातील वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या घटनेचे चित्रीकरण करणाºया त्याच्या भावजयीच्या हातातील मोबाइल पोलिसांनी हिसकावला, तर घडल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची भाषा राकेशचे बंधू हरीश पांडेय यांनी वापरताच ‘चल रे ए सीएमवाल्या...’ असे उर्मट उत्तर दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विटावा येथे शुक्र वारी रात्री ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेच्या कळवा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी एका महिलेच्या हातातील मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. एखाद्या महिला पोलिसाऐवजी स्वत: पोलीस अधिकाºयानेच मोबाइल हिसकावण्याचे ‘कर्तव्य’ बजावल्याने संताप व्यक्त होत आहे.
२७ एप्रिल रोजी रात्री नवी मुंबईतील राकेश पांडेय यांना वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल विटाव्याजवळ वाहतूक पोलिसांनी अडवून ५०० रुपयांच्या दंडाची आकारणी केली. मात्र, त्याची पावती दिली नाही. यावरूनच हा वाद उद्भवला. त्यावेळी राकेश यांनी नवी मुंबई भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी हरीश पांडेय या आपल्या भावाला फोनवरून या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत राकेश यांना पोलिसांनी विटावा बीट चौकीत नेले. थोड्याच वेळात हरीश हे त्यांच्या पत्नीसह विटावा चौकीत दाखल झाले. आपल्यावरील कारवाई चुकीची असल्याचा आरोप करून राकेश यांनी ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडे १०० क्रमांकावरून दिली. त्यामुळे त्यांना दोन वाहतूक पोलिसांनी आव्हाड यांच्यासमोर हजर केले. हरीश यांनी आपण भाजपा पदाधिकारी असल्याचे सांगितल्यावर तर आव्हाड यांचा पाराच चढला. ‘कोण भाजपा ते मला सांगू नकोस...’ ‘ही तक्रार सीएमकडे करू’, असे जेव्हा पांडेय बोलले तेव्हा ‘चल रे ए सीएमवाल्या...’ अशा भाषेत आव्हाड यांनी त्यांना सुनावले. हेच चित्रिकरण हरीश यांची पत्नी मोबाइलवरुन करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी हरीश पांडेय यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे.
- शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे
हरीश व राकेश पांडेय यांनी पोलिसांबरोबर अरेरावी केली. त्यासंदर्भात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबतच्या वृत्तात तथ्य नाही.
- मनोहर आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग