सिंधी समाजाच्या चालीया उत्सवाला सुरुवात, चालिया मंदिर बंद, भक्तांना ऑन लाईन दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:28 PM2020-07-16T16:28:20+5:302020-07-16T16:43:05+5:30

उल्हासनगरात बहुसंख्यांने सिंधी समाज राहत असून समाज चेटीचंड व चालीया उत्सव मोठ्या धुमधडक्यात साजरा करतात

Chalia festival of Sindhi community begins, Chalia temple closed, online darshan to devotees | सिंधी समाजाच्या चालीया उत्सवाला सुरुवात, चालिया मंदिर बंद, भक्तांना ऑन लाईन दर्शन

सिंधी समाजाच्या चालीया उत्सवाला सुरुवात, चालिया मंदिर बंद, भक्तांना ऑन लाईन दर्शन

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर : सिंधी समाजाच्या पवित्र चालीया उत्सवाला गुरवारी १६ जुलै पासून कन्या पूजनाने सुरवात झाली. मात्र कोरोनाच्या महामारीत मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

उल्हासनगरात बहुसंख्यांने सिंधी समाज राहत असून समाज चेटीचंड व चालीया उत्सव मोठ्या धुमधडक्यात साजरा करतात. श्रावण महिन्या प्रमाणे सिंधी समाज चालीया उत्सवा दरम्यान उपवास करून केस कापत नाही. चाळीसाव्या दिवसी चालीया मंदिरातील तलावात मटके फोडून उपवास सोडतात. तसेच केस कापतात. तीर्थस्थळचा दर्जा मिळालेल्या, कॅम्प नं-५ येथील चालीया मंदिरात चाळीस दिवसाच्या उत्सवाला देश विदेशातील हजारो सिंधी नागरिक दर्शनासाठी येत असतात. मात्र यावर्षी मंदिर बंद राहणार असून परिसरात शुकशुकाट आहे. पोलिसांनी नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून मंदिर परिसरात लोखंडी बैरेक लावल्या आहे. तसेच पोलिसांनी मंदिर परिसरात भक्तांनी गर्दी करू नये. असे आवाहन केले. तर मंदिर प्रशासनाने भक्तासाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा केली. घरात बसून दर्शन घेण्याचे मंदिर प्रसाशनाकडून सांगण्यात आले.

उत्सवाच्या चाळीसाव्या दिवसी मटकी घरीच फोडण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने सिंधी बांधवांना केले. शहरतील कॅम्प नं-१ येथील झिलेलाल मंदिर व कॅम्प नं-५ येथील चालिया मंदिरात चालीया उत्सव साजरा केला जातो. तीर्थस्थळचा दर्जा मिळालेल्या चालीया मंदिरात पाकिस्तान मधील मूळ चालिया मंदिरातून तेवती ज्योत आणली असून गेल्या सत्तर वर्षा पासून ज्योत सतत तेवत आहे. गुरवारी कन्या पूजनाने चालीया उत्सवाची सुरुवात झाली. चालीया मंदिरात पूजन नेहमी प्रमाणे सुरु राहणार असून उत्सवा दरम्यान आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, अन्नदान आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. सिंधी समाजातील नेत्यांनी मंदिर परिसरात भक्तांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले.

Web Title: Chalia festival of Sindhi community begins, Chalia temple closed, online darshan to devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.