खुनाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:45 AM2018-05-21T01:45:29+5:302018-05-21T01:45:29+5:30

एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा खून केल्यानंतर त्याचे प्रेत गोणीत भरून ते वागळे इस्टेट भागातील बुश कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या निर्जनस्थळी टाकण्यात आले होते.

Challenge before the murder investigation police! | खुनाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान!

खुनाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान!

Next

ठाणे : एका तरुणाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचे प्रेत वागळे इस्टेट येथील एका बंद कंपनीच्या बाजूला टाकले होते. या घटनेला दोन आठवडे उलटूनही खुन्यांचा किंवा मृतदेहाचा कसलाच छडा लागलेला नाही. त्यामुळे या खुनाचा तपास लावणे, हे आता ठाणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा खून केल्यानंतर त्याचे प्रेत गोणीत भरून ते वागळे इस्टेट भागातील बुश कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या निर्जनस्थळी टाकण्यात आले होते. ४ मे रोजी घडलेल्या या घटनेचा अद्यापही छडा लागलेला नाही. दरम्यान, वागळे इस्टेट पोलिसांच्या दोन आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या चार अशा सहा पथकांकडून या खुनाचा समांतर तपास करण्यात येत आहे. खून करणाऱ्यांसह मृतदेहाच्या ओळखीबाबत दोन आठवडे उलटूनही काहीच थांगपत्ता लागलेला नाही. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांच्या पथकाने आतापर्यंत बुश कंपनीपासून संपूर्ण वागळे इस्टेट, श्रीनगर परिसरातील ३०० ते ४०० सीसीटीव्हींची तपासणी केली. तसेच अनेक संशयितांची चौकशी केली. तपास करणाºया सहाही पथकांनी ५० ते ६० जणांकडे चौकशी करूनही काहीच हाती लागलेले नाही. अनेक ठिकाणी रहिवासी बाहेरगावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गेल्या दोन आठवड्यांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३५ आणि मुंबईतील १०८ पोलीस ठाण्यांपैकी एकाही पोलीस ठाण्यात या वयोगटातील व्यक्ती बेपत्ता असल्याबाबतची तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. जर अशी एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याबाबत किंवा अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यास त्यादृष्टीनेही तपास करणे सोपे जाईल, असेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.
मिळालेल्या मृतदेहाचीही ओळख न पटल्याने या खुनाच्या तपासातील गुंतागुंत आणखीनच वाढली आहे. जरी हे आव्हान असले, तरी आम्ही हे खून प्रकरण लवकरच उघड करू, असा दावा आता वागळे इस्टेट पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारीही करत आहेत.

खबऱ्यांना माहिती नाही
खबºयांकडूनही माहिती मिळवूनही काही हाती न लागल्यामुळे वागळे इस्टेट भागात हा मृतदेह अन्य भागांतून कोणी आणून टाकला का, हे गूढ उकलणे आव्हान ठरले आहे.

Web Title: Challenge before the murder investigation police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.