महिलेच्या हत्येच्या तपासाचे आव्हान, वाडेघरमधील घटना : माहिती देणा-यास बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:17 AM2017-10-10T02:17:32+5:302017-10-10T02:17:57+5:30

पश्चिमेतील वाडेघर परिसरात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत एका ३५ ते ४० वयोगटांतील महिलेचा मृतदेह शनिवारी आढळला होता. या महिलेची ओळख अजूनही न पटल्याने तपासाचे आव्हान खडकपाडा पोलिसांपुढे आहे.

 Challenge of the murder of the woman, the incident in Wadehoor: The reward for the informant | महिलेच्या हत्येच्या तपासाचे आव्हान, वाडेघरमधील घटना : माहिती देणा-यास बक्षीस

महिलेच्या हत्येच्या तपासाचे आव्हान, वाडेघरमधील घटना : माहिती देणा-यास बक्षीस

Next

कल्याण : पश्चिमेतील वाडेघर परिसरात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत एका ३५ ते ४० वयोगटांतील महिलेचा मृतदेह शनिवारी आढळला होता. या महिलेची ओळख अजूनही न पटल्याने तपासाचे आव्हान खडकपाडा पोलिसांपुढे आहे. पोलिसांनी महिलेची माहिती देणाºयास १० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाडेघर येथील नीळकंठ सृष्टीजवळील मोकळ्या मैदानात पत्र्याच्या कम्पाउंडजवळ शनिवारी सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळी पोलिसांना सिमेंटचे दगड आणि विटा सापडल्याने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
महिलेच्या अंगावर राखाडी रंगाची व काळ्या किनारीची साडी आहे. मनगटाजवळ सुनीता असे गोंदलेले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. परंतु, या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप तिचा कोणीही नातेवाईक न आल्याने तिची ओळख पटलेली नाही. तिच्या वारसाने अथवा नातेवाइकाने पुढे यावे तसेच या हत्येच्या घटनेबाबत कोणाला माहिती असल्यास ती द्यावी, त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक : ०२५१-२२३४८३२, मोबाइल नंबर ०८८८८१६३३११ , ०९०१११९५१९५.

Web Title:  Challenge of the murder of the woman, the incident in Wadehoor: The reward for the informant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.