रस्त्याच्या दुतर्फा गवतामुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:36+5:302021-09-16T04:50:36+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला वाढलेले गवत रस्त्यावर आल्याने पुढील मार्ग दिसेनासा झाला आहे. त्यामुळे अपघात ...
भातसानगर : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला वाढलेले गवत रस्त्यावर आल्याने पुढील मार्ग दिसेनासा झाला आहे. त्यामुळे अपघात हाेण्याची शक्यता वाढली आहे.
गावागावातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. हे गवत थेट रस्त्यावर आल्याने आधीच अरुंद व खड्डे पडल्याने अपघातग्रस्त बनलेले रस्ते या गवतामुळे अधिकच धोकादायक बनले आहेत. समोरून आलेले वाहन दिसत नसल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होण्याची शक्यता वाढल्याने या रस्त्यांवरून वाहने चालविणे अधिकच धोक्याचे बनले आहे. या गवतामुळे दोन्ही बाजूंनी रस्ता चिकट बनल्याने तो अधिक धोकादायक बनला आहे. गावागावांतील रस्त्यांवरील गवत काढणे ही बांधकाम विभागाची जबाबदारी आहे; मात्र कोणत्याच रस्त्यावरील दोन्ही बाजूचे गवत कधीच काढले जात नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही आमची जबाबदारी नाही. काही गावांचे रस्ते आमच्या अखत्यारीत येत नाहीत. तर पंचायत समिती बांधकाम विभागाकडे विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी हे गवत काढणे गरजेचे असल्याचे सांगत जबाबदारी टाेलवली.