ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर ऩारायण सुर्वेंच्या कवितांचे रंगमंचिय प्रस्तुतीकरण 'चंद्रा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 04:23 PM2019-01-14T16:23:37+5:302019-01-14T16:25:35+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर ऩारायण सुर्वेंच्या कवितांचे रंगमंचिय प्रस्तुतीकरण 'झाले.
ठाणे : आजपर्यंत आपण कविता वाचल्या ऐकल्या पण कविता पाहण्याचा अनुभव आला अभिनय कट्टा क्रमांक ४११ मध्ये पद्मश्री नारायण सुर्वें यांच्या कवितांना मिळाली अभिनयाची जोड आणि शब्द अवतरले वास्तवात रंगमंचावर आणि सादर झालं बर्डस ऑफ हेवन प्रस्तुत चंद्रा. अर्चना केळकर देशमुख हयांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनातून साकारलेलं ऩारायण सुर्वें च्या कवितां चे रंगमंचिय प्रस्तुतीकरण.
चंद्रा हया कलाकृती द्वारे - ऩारायण सुर्वें च्या कवितां चे रंगमंचिय प्रस्तुतीकरण करताना सुर्वेंच्या कवितां मधून व्यक्त होणारा अमूर्त भवतालाला व व्यक्तिरेखांना मू्र्त स्वरूप देऊन प्रेक्षकांना - ऩारायण सुर्वेंच्या कवितांचा सखोल आस्वाद आणि अनुभव देण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. 'चंद्रा' ह्या दोन अंकी रंगमंचिय प्रस्तुतीकरण करणातून सूर्वेंच्या कवितांतील निवडक ओळींनी बेतलेले, कष्कटरी वर्गाच्या जीवनाचे प्रतिबिंब हे पहिल्या अंकाचे वैशिष्ठ्य आहे तर सूर्वेंच्या व्यक्तिगत अनुभवांतील कवडसे हे दूसरया अंकाचे. सदर कलाकृतीत संतोष पाटील, रवींद्र वीरकर,क्षितिज भंडारी,आशुतोष घोरपडे, योगेश भालेकर, अजिनाथ सानप, विवेक मिस्त्री, संकेत मोरे,दीपक तांबे, प्रशांत पाटील, शहाजी चिले, उत्कर्षा वायकर,पूजा सावंत,नम्रता घाटगे,पूजा जव्हारे, अमृता अरुण,ज्योती सावंत या कलाकारांनी आपल्या अभिनयाने कवितांना रंगमंचावर जिवंत केले.सदर सादरीकरणाला विवेक गुरव आणि यश मोरे ह्यांनी संगीत संयोजन केले. कट्टा क्रमांक ४११ चे निवेदन राजन मयेकर ह्यांनी केले. कट्ट्याची सुरुवात दिग्दर्शिका अर्चना केळकर ह्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून झाली.त्यानंतर अभिनय कट्ट्याच्या कलाकार परेश दळवी ह्याने पु. ल. देशपांडे लिखित 'तुझे आहे तुजपाशी' ह्या नाटकातील एक प्रवेश सादर केला.