भाजप राज्यात २०० हून अधिक जागा जिंकणार: चंद्रशेखर बावनकुळे
By अजित मांडके | Published: November 5, 2022 03:09 PM2022-11-05T15:09:17+5:302022-11-05T15:10:53+5:30
कितीही पक्ष एकत्र आले तरीही आमचाच विजय होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे ध्येय आहे. असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात केलं.संघटनामक दोऱ्याच्या निमित्ताने बावनकुळे हें शनिवारी ठाण्यात आलें होतें. तेव्हा त्यांनी संयोग मंदिर येथे पत्रकारांशी संवाद साधला.
भारतीय जनता पार्टी हा राज्यातला पहिला क्रमांकाचा पक्ष आहे .पण आम्हांला पक्षाची ताकद राज्यात 51टक्के इतकी वाढवायची. परिणामी कितीही पक्ष एकत्र आलें तरीही आमचाच विजय होईल यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार प्रत्येक बूथवर 18 वर्षावरील किमान नऊ मतदाराची नोंद करणे. तसेच महाविकास आघाडीचे पंचवीस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश व्हावा. असें लक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी राज्याच्या विकासासाठी 18 तास काम करतायेत .तर यापूर्वीचे मुख्यमंत्री मागील अडीच वर्षापैकी 18महिने मंत्रलयात गेले नाहीत. असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
राज्यात मागील अडीच वर्षे पोषक वातावरण नव्हतं. पण आता शिंदे आणि फडणवीस दोघेही मोदींच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस काम करत आहेत. पुढील काळात मागील अडीच वर्षात राज्याचे जें नुकसान झालं तें भरून काढण्याचं काम हें सरकार करेल. असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांच्या 200 हून अधिक जागा जिंकण्याचे. तर लोकसभेत 45 जागा जिंकण्याचं आमचं लक्ष आहे. येणाऱ्या काळात तळागाळातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करून शिंदे फडणवीस सरकार चं काम लोकांपर्यंत पोहचवू. तर आपल्या या दोऱ्याच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या समस्या आपण सरकार पर्यंत पोहचवू असंही बावनकुळे म्हणाले.
भाजपकडे लोकांचा कल वाढत आहे.2024मध्ये महाविकास आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार मिळणार नाही. इतके भाजपात प्रवेश होतील. असा आशावाद बावनकुळे यांनी व्यक्त केला. तर आगामी महापालिका निवडणूकांच्या संदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा आणि त्यांची मते जाणून घेऊन निर्णय होईल. मात्र विधानसभा लोकसभा निवडणुकीत निर्णय झाला असून शिंदे भाजपा गटाची युती पक्की आहे. ज्या ज्या ठिकाणी शिंदे गटाबरोबर युतीचा निर्णय होईल तिथे त्यांच्या मागे पूर्ण ताकद उभी करू.असं बावनकुळे म्हणाले.
आजच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कधी होणार हें कोणीच सांगू शकतं नाही. या निवडणुकांचा आज कुठे वासच नाही.तसेच शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली भेट ही वेगळ्या कारणासाठी असेल. पण काहीजण मुद्दामहून त्या भेटीची वेगळी चर्चा करतात. यापूर्वी एकदा कपट कारस्थान झालं होतं.उद्धव ठाकरे यांनी जी बेईमानी केली त्याचा बदला एकनाथ शिंदे यांनी घेतला.असं बावनकुळे म्हणाले.
आम्हाला कोणाचेही आमदार फोडायचे गरज नाही.राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा कार्यकर्त्यांनी नव्हे तर नेत्यांनी हायजॅक केली आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. एकीकडे ही यात्रा महाराष्ट्र येत असतांना येथील काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करतायेत. येत्या काही दिवसांत मोठे नेते प्रवेश करतील. या यात्रेत पक्ष वाढत नसून तो फुटतो आहे.अशी खिल्ली ही बावनकुळे यांनी उडवली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"