मतमाेजणीसाठी ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल

By जितेंद्र कालेकर | Published: November 21, 2024 09:48 PM2024-11-21T21:48:34+5:302024-11-21T21:49:17+5:30

वाहतूक शाखेचे आदेश: पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांची माहिती

change in traffic route in thane for counting of votes | मतमाेजणीसाठी ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल

मतमाेजणीसाठी ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येत्या २३ नाेव्हेंबर राेजी वागळे इस्टेट आयटीआय काॅलेजजवळ काेपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघांची मतमाेजणी हाेणार आहे. त्यामुळे या भागात हाेणारी संभाव्य राजकीय कार्यकर्त्यांची, तसेच नागरिकांची गर्दी लक्षात घेता श्रीनगर वागळे इस्टेट या भागातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. त्याऐवजी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक नियत्रंण शाखेचे पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी केले आहे.

वाहतूक बदलाबाबतची अधिसूचना उपायुक्त शिरसाठ यांनी काढली आहे. त्यानुसार २३ नाेव्हेंबर राेजी पहाटे ५ ते मतमाेजणी संपेपर्यंत जुनागाव, कैलासनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहने धर्मवीर चाैकातून उजवीकडे वळून आयटीआय काॅलेज मार्गे २२ नंबर सर्कलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना धर्मवीर चाैक येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी ही वाहने जुनागाव कैलासनगरकडून धर्मवीर चाैकातून उजवीकडे वळून आयटीआय काॅलेजमार्गे २२ नंबर सर्कलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही धर्मवीर चाैकातून पुढे वागळे इस्टेट डेपाे मार्गे जातील.

त्याचबराेबर हनुमाननगर परिसरातील सर्व वाहने वागळे इस्टेट येथील सर्व बसेस साठेनगर चाैकातून राेड नंबर २२ ने जातील. तसेच राेड क्रमांक १६ कडून २२ क्रमांक सर्कल, टाटा फायजन कट, आयटीआय काॅलेज, धर्मवीर चाैक, रामनगर जाणाऱ्या वाहनांना २२ नंबर सर्कल येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी राेड नं. १६ कडून २२ न. सर्कल- आयटीआय काॅलेज, रामनगरकडे जाणारी वाहने २२ नंबर सर्कल येथून डावीकडे आणि उजवीकडे वळण घेउन पुढे जातील, असेही या आदेशामध्ये म्हटले आहे.

Web Title: change in traffic route in thane for counting of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.