गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कार्यालयीन वेळा बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:39 AM2021-04-06T04:39:23+5:302021-04-06T04:39:23+5:30

डोंबिवली : गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने साेमवारपासून कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे लाेकलची गर्दी कमी हाेईल, अशी अटकळ हाेती. ...

Change office hours to control crowds | गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कार्यालयीन वेळा बदला

गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कार्यालयीन वेळा बदला

Next

डोंबिवली : गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने साेमवारपासून कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे लाेकलची गर्दी कमी हाेईल, अशी अटकळ हाेती. मात्र, आज सकाळच्या सत्रात लाेकलमध्ये तुडुंब गर्दी झाल्याने हा अंदाज खाेटा ठरला आहे. विशेषत: महिला डब्यात गर्दीतूनच फेरीवाले मुक्त संचार करताना दिसत आहेत. त्यामुळे लाेकलमधील गर्दीवर नियंत्रण कसे मिळवणार? असा सवाल रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाला विचारला आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर कार्यालयीन वेळा बदलणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

कोरोना कमी करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ उपक्रम सोमवारी रात्रीपासून सुरू केला असला तरी प्रत्यक्षात मानसिकतेत बदल झालेला नाही? मग ही चेन कशी ब्रेक हाेणार? लोकलमध्ये ठराविक कालावधीत विशेषतः सकाळी ७.३० ते १० आणि संध्याकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत खूप गर्दी होते. महिलांच्या डब्यात शिरायला जागा नसते. त्यामध्ये साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. कार्यालयीन वेळा बदलून लाेकलमधील ही गर्दी विभागता येऊ शकते. मात्र, त्याची अंमलबजावणी करणे राज्य सरकारला जमलेले नसल्याचे एकूणच परिस्थितीवरून दिसत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ ही मानसिकता बदलून पूर्वीसारखे पहिली, दुसरी आणि तिसरी पाळी अशा शिफ्ट ठरवून मोठ्या कंपन्यांनी, मालकांनी, उद्योजकांनी कामाचे नियाेजन करायला हवे. मंत्रालय, कोर्टाच्याही वेळात विभागून त्यानिहाय तत्काळ कार्यवाही करायला हवी, असेही संघटनेचे म्हणणे आहे.

मागणी जुनीच

कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत २०१६ पासून मागणी केली जात आहे. त्याची पूर्तता केंद्र, राज्य सरकार का करू शकत नाही? अशा आपत्कालीन स्थितीत याची अंमलबजावणी झाल्यास मार्ग निघून गर्दीवर आळा बसू शकताे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. बदल करण्यासाठी राज्य शासन, रेल्वे यंत्रणांना सहकार्य करण्याची तयारीही संघटनेने व्यक्त केली.

------------

Web Title: Change office hours to control crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.