बदल्यांमुळे गॉडफादर बदलले

By admin | Published: May 12, 2017 01:34 AM2017-05-12T01:34:17+5:302017-05-12T01:34:17+5:30

महापालिकेत एकाच विभागात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय आयुक्त सुधाकर शिंदे

Changes in Godfather due to changes | बदल्यांमुळे गॉडफादर बदलले

बदल्यांमुळे गॉडफादर बदलले

Next

लोकमत न्युज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेत एकाच विभागात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय आयुक्त सुधाकर शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे धाबे दणाणलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आता भाजपामधील ‘गॉडफादर’चे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेत सत्ताबदल झाल्यावर कारभार पारदर्शक होण्यासाठी प्रस्तापित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उचलबांगडीची करण्याची मागणी सत्ताधारी नगरसेवकांनीच उचलून धरली होती. आता आयुक्तांनी बदलीचा आसूड ओढताच भीतीपोटी ही मंडळी राजकारण्यांना शरण गेल्याने प्रशासनाच्या तळातील नोकरशाहीला आपल्या ताब्यात राखण्याची ही सत्ताधारी पक्षाची खेळी असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
उल्हासनगर महापालिकेत वरिष्ठ नेते व राजकीय नेत्यांच्या मर्जीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे बदली होत नाही. आतापर्यंत शिवसेनेच्या ताब्यात सत्तेच्या नाड्या असल्याने अनेक अधिकाऱ्यांनी शिवसेनेतील गॉडफादर पकडले होते. आता सत्ताबदल होऊन भाजपाकडे सत्तेची सूत्रे आल्याने या अधिकाऱ्यांना सत्ताबदलाचा इंगा दाखवण्याकरिता भाजपाच्या नेत्यांनी बदल्यांकरिता आयुक्तांकडे आग्रह धरला. अधिकाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाल्याच्या तक्रारी सत्ताधारी भाजपा नगरसेवकाकडे नागरिकांनी केल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवडयात शिक्षण मंडळातील शिक्षकांची सरसकट बदल्या आयुक्त शिंदे यांनी केल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी भाजपाचे वरिष्ठ नगरसेवक प्रदीप रामचंदानी, सभागृह नेता जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा आदींनी पालिका आयुक्ताकडे केली. आयुक्त शिंदे यांनी एकाच विभागात किमान ३ वर्षे राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीचे संकेत दिले आहेत. ज्यांनी एकाच विभागात संपूर्ण सेवाकाळ घालवला त्यांनी आता भाजपा नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Changes in Godfather due to changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.