दहिहंडीसाठी ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल

By जितेंद्र कालेकर | Published: August 17, 2022 10:12 PM2022-08-17T22:12:55+5:302022-08-17T22:13:48+5:30

मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ येथे १९ आॅगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे.

Changes in transport route in Thane for the Dahi Handi | दहिहंडीसाठी ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल

दहिहंडीसाठी ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल

Next

ठाणे: टेंभी नाका येथे होणाऱ्या दहिहंडी उत्सवासाठी शहरातील वाहतूकीमध्ये बदल केल्याची अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेने काढली आहे. त्यामुळे यावेळी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी केले आहे.

मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ येथे १९ आॅगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून क्रीक नाकामार्गे दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथून उजवीकडे वळण घेऊन एवन फर्निचर मार्गे ही वाहने जातील. त्याचबरोबर कळवा आणि साकेत मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना उर्जिता हॉटेल येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी क्रीक नाका मार्गे डावीकडे वळण घेऊन दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलकडून उजवीकडे वळण घेऊन एवन फर्निचर मार्गे ही वाहने जातील. ठाणे रेल्वे स्थानकापासून टॉवर नाका, टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद केला आहे. 

त्याऐवजी सॅटिस ब्रिज मार्गे येणाऱ्या परिवहनच्या बसेस गोखले रोड मार्गे जातील. तर रिक्षा आणि चार चाकी वाहनांना सॅटिस ब्रिज खालून स्टेशन रोड मूस चौक मार्गे डावीकडे वळण घेऊन जाण्याचे आवाहन वाहन चालकांना पोलिसांनी केले आहे.
 

Web Title: Changes in transport route in Thane for the Dahi Handi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.