परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल - स्वाती कुलकर्णी- तोरसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 04:59 PM2019-03-31T16:59:35+5:302019-03-31T17:02:36+5:30

परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल असल्याचे मत स्वाती कुलकर्णी- तोरसेकर यांनी ठाण्यात मांडले.

Changes in international policy are favorable for India - Swati Kulkarni - Torsekar | परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल - स्वाती कुलकर्णी- तोरसेकर

परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल - स्वाती कुलकर्णी- तोरसेकर

googlenewsNext
ठळक मुद्देपरराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल - स्वाती कुलकर्णी- तोरसेकर परराष्ट्र धोरण 2014 ते 2019 या विषयावर परिसंवादभारतीय परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे या पुस्तकाच्या निमित्त परिसंवाद

ठाणे : आपल्या देशाच्या परराष्ट्रीय धोरणात गेल्या पाच वर्षात झालेला आमूलाग्र बदल देशासाठी अनुकूल ठरत आहे. पंतप्रधान मोदी यांनी जगभरात परराष्ट्र नीतीचे वस्त्र भक्कमपणे विणले आहे. परराष्ट्र धोरण राबविताना निर्णयाला न घाबरणे, त्या निर्णयाची नियोजित वेळेत अंमलबजावणी करणे, ते यशस्वी होईलना याची शक्यता तपासून घेणे आणि त्याचा अपेक्षित परिणाम येणार नसेल तर देशाच्या आत्मसन्मानाशी तडजोड न करता लवचिकता स्वीकारणे हे पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या पाच वर्षातील परराष्ट्र धोरणाचे सूत्र राहिले आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक स्वाती कुलकर्णी-तोरसेकर यांनी केले. 

    दीनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित परराष्ट्र धोरण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या विषयावरील परिसंवादात स्वाती कुलकर्णीं तोरसेकर बोलत होत्या. येथील सहयोग मंदिर सभागृहात झालेल्या परिसंवाद स्वाती कुलकर्णी तोरसेकर बोलत होत्या. इस्त्रायलच्या भारतीय दूतावासात कार्यरत असणाऱ्या अनय जोगळेकर यांनी लिहिलेल्या भारतीय परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे या पुस्तकाच्या निमित्त या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार अरुण करमरकर, अनय जोगळेकर, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा.वा.दाते, कार्यवाह मकरंद मुळे उपस्थित होते. आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, पंतप्रधान  मोदी यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाला एक निश्चित चेहरा प्राप्त करून दिला आहे. दक्षिण आशियात एक विश्वास निर्माण केला आहे. चीनची लहान देशांना वाटणारी भीती आणि त्या भीतीपोटी चीनच्या अटी मान्य करण्याची अगतिकता यातून त्या देशांची मोदी यांच्या सहकार्य-सहमती-संवाद या धोरणाने सुटका होत आहे. स्वप्नाळू पंचशील ते क्रियाशील पंचसूत्री असा परराष्ट्र धोरणाचा प्रवास २०१४ ते २०१९ या दरम्यान झाला आहे. "राष्ट्र प्रथम" अश्या मूलभूत भूमिकेतून आंतरराष्ट्रीय समुदायाशी प्रस्थापित होणारे संबंध प्रभावी ठरत आहेत. परदेशी भारतीयांना नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या सादेला मिळणारा प्रतिसाद उस्फुर्त आहे. डावपेच आणि धोरण अश्या दुहेरी तंत्राचा वापर होत आहे. मध्य पूर्वेतील देश भारताबरोबर मैत्री करण्यासाठी उत्सुक आहेत. आखाती देशात वंदे मातरमचे सूर उमटणे, तेथे मंदिर निर्मिती होणे आणि योग दिन  आंतरराष्ट्रीयस्तरावर  साजरा होण्यास सुरुवात होणे अशी अनेक उदाहरणे मोदी नीतीची झलक आहे असे स्वाती कुळकर्णी-तोरसेकर म्हणाल्या.अनय जोगळेकर आपल्या भाषणात म्हणाले,  मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी परराष्ट्र धोरणास अलिप्ततावादाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढले आणि राष्ट्रीय हिताशी संलग्न केले. दोन गटांत विभागल्या गेलेल्या जगात दोघा गटांपासून एकसमान अंतर ठेवणे, या भूमिकेला शीतयुद्धाच्या काळात व्यावहारिकदृष्ट्या नाही, पण किमान भावनिकदृष्ट्या अर्थ होता. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर त्याला भावनिक अर्थही उरला नाही. सुमारे १६२ दूतावास आणि ६०० परराष्ट्र सेवेतील अधिकारी असणाऱ्या परराष्ट्र विभागाच्या मर्यादा ओळखून नरेंद्र मोदी सरकारने ३ कोटीहून अधिक प्रवासी भारतीय, इंटरनेट-समाज माध्यमं तसेच सरकारचे विविध विभाग आणि देशातील विविध राज्यांचा परराष्ट्र संबंध सुधारण्यासाठी उपयोग केला आहे असे सांगून आपल्या भाषणाच्या शेवटी अनय जोगळेकर म्हणाले, नरेंद्र मोदींचे मॅरॉथॉन परदेश दौरे, जागतिक नेत्यांशी त्यांनी जोडलेले व्यक्तिगत नातेसंबंध, त्यामुळे भारताच्या या देशांशी असलेल्या संबंधांमध्ये झालेली भरीव सुधारणा, परराष्ट्र धोरणात देशाची सुरक्षा, संस्कृती आणि समृद्धीला दिलेले प्राधान्य, शेजारी राष्ट्रांना दिलेलं प्राधान्य, त्याच बरोबर देशातील राज्यांना दिलेलं महत्त्व, प्रवासी भारतीयांशी साधलेला संवाद आणि त्यांच्या पुढच्या पिढीला भारताचे सदिच्छा दूत म्हणून पाठबळ देण्याचे झालेले आग्रही प्रयत्न, भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी इंटरनेट आणि समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर  या सगळ्यांच्या एकत्रिकीकरणातून परराष्ट्र धोरणाची मोदी-नीती समोर आली आहे. परिसंवादाचा समारोप करताना पत्रकार अरुण करमरकर म्हणाले, बौद्ध आणि हिंदू देशांची परिषद आणि समुद्र किनारे लाभलेले देश विशेषतः हिंदी महासागर केंद्रित असलेले देश यांच्या परिषदा त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संघटन यासह अनेक महत्वपूर्ण बाबींवर २०१४ ते २०१९ दरम्यान काम झाले आहे. मोदी सरकारची परराष्ट्र आघाडीवरची कामगिरी अतिशय प्रभावी आहे. परराष्ट्र धोरणात सुसूत्रता, सातत्य आणि भारत हित याची गती वाढती राहण्यासाठी राष्ट्रीय वृत्तीचे, कणखर नेतृत्व असलेले सरकार बहुमताने निवडून देणे गरजेचे आहे, असे अरुण करमरकर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह मकरंद मुळे यांनी केले. भा.वा.दाते यांनी वक्त्यांचे स्वागत केले. परिसंवादाला राज्यशास्त्राचे विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. संपुआ सरकारच्या काळात सीमांशी तडजोड करण्याची तयारी सुरू होती. सियाचीनवर पाणी सोडून देण्याचा वाटाघाटी सुरू होत्या. असा आरोप स्वाती कुलकर्णी-तोरसेकर यांनी आपल्या भाषणात केला. छोट्या देशांना चीनच्या जबड्यात ढकलण्यात आले. अनेक देश भारताकडे मोठ्या आशेने बघत असताना त्यांची घोर निराशा युपीएच्या दहा वर्षांच्या काळात झाली. दशतवादविरोधी आंतरराष्ट्रीयस्तरावर आघाडी उघडण्याचे नेतृत्व स्विकारण्याऐवजी बोटचेपे धोरण स्वीकारले, असेही स्वाती कुलकर्णी-तोरसेकर म्हणाल्या.

Web Title: Changes in international policy are favorable for India - Swati Kulkarni - Torsekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.