गणपती विसर्जनासाठी वाहतूकमार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:21 AM2019-09-06T00:21:48+5:302019-09-06T00:21:58+5:30

तीन दिवस त्रास : वाहतूक पोलिसांचा निर्णय

Changes in transport route for Ganpati immersion | गणपती विसर्जनासाठी वाहतूकमार्गात बदल

गणपती विसर्जनासाठी वाहतूकमार्गात बदल

Next

ठाणे : ठाणे शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जनमार्गावर वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पाच दिवसांच्या (६ सप्टेंबर), सात दिवसांच्या (८ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी (१२ सप्टेंबर) या तीन दिवसांच्या काळात वाहतूकमार्गात बदल केले आहे. यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.

याा दिवसांच्या कालावधीमध्ये वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव तसेच वर्तकनगर येथील उपवन तलाव या ठिकाणी ठाण्यासह मुंबई उपनगरांतील श्रींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पुढीलप्रमाणे बदल केले आहेत.
मॉडेला चेकनाका येथून वागळे इस्टेट विभागाकडे जाणाऱ्या टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना सिंधुदुर्ग हॉटेल येथून मुख्य रस्त्याने (स.गो. बर्वे मार्गाने) जाण्यास प्रवेश बंद केला आहे. त्यासाठी मॉडेलनाका येथून रोड क्रमांक १६ आणि वागळे इस्टेट विभागाकडे जाणारी वाहने सिंधुदुर्ग हॉटेल येथे डावीकडे वळून जगदाळे ट्रान्सपोर्ट येथे उजवीकडे वळून शांताराम चव्हाण मार्गाने एमआयडीसी आॅफिस येथे डावीकडे वळून मुख्य रस्त्याने जातील.
याठिकाणचे मार्ग बंद : वागळे इस्टेट, रोड क्रमांक १६ कडून मॉडेलनाक्याकडे जाणाºया टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना रोड क्रमांक १६ पेट्रोलपंप येथे प्रवेश बंद केला आहे. त्यासाठी रोड क्रमांक १६ येथून मॉडेलानाका, मुंबईकडे जाणारी वाहने रोड क्रमांक १६ येथून डावीकडे वळून अ‍ॅग्रीकल्चर कार्यालय-ब्राडमा कंपनीमार्गे कामगार हॉस्पिटल रोडने नितीन जंक्शनमार्गे जातील.

हे मार्ग राहणार बंद
च्मॉडेला चेकनाकामार्गे तीनहातनाका येथे वळण घेऊन जाणाºया बसेसना मॉडेला चेकनाका येथे प्रवेश बंद केला आहे. मुलुंड चेकनाका येथेच प्रवासी उतरवतील आणि तिथूनच प्रवासी घेऊन परत मुंबईकडे जातील.
च्देवदयानगरनाका, कॉस येथून उपवन तलावाकडे जाणाºया टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना येऊर गेटपर्यंत प्रवेश बंद केला आहे. त्यापुढे मुख्य दुतर्फा रस्त्याने उपवन तलावाकडे जाण्यास प्रवेश बंद आहे. पर्यायी मार्ग- देवदयानगर क्रॉसनाका येथून उपवन तलाव गावंडबाग क्रमांक-२ विभागाकडे जाणारी वाहने मंत्रांजली बंगला-नीळकंठ हाइट्समार्गे मुख्य रस्त्याने पुढे जातील.
च्कृत्रिम उपवन तलाव पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार गावंडबागकडून येऊर गावाकडे उपवनमार्गे जाणाºया दुतर्फा रस्त्याने टीएमटी बसेससह सर्व वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यांनी नीळकंठ हाइट्समार्गे देवदयानगरनाका क्रॉस-शिवाईनगर सर्कलमार्गाचा वापर करावा.

Web Title: Changes in transport route for Ganpati immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.